maharashtra din महाराष्ट्र् राज्याची घडणूक रचना  १ मे १९६० या दिवशी झाली त्यामळे हा दिवस महाराष्ट्र् दिवस म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्र दिनादिवशी सार्वजनिक सुट्टी देखील असते आणि हा दिवस महाराष्ट्रात मोठया आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो.


महाराष्ट्र राज्य हे संत विद्वानांचे राज्य देखील मानले जाते.
१ मे या तारखेला कामगार दिन सुद्धा साजरा केला जाणार आहे.

Maharashtra Day महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसाचे महत्व लक्ष्यात ठेऊन काही कार्यक्रम आयोजन केले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले होते तर त्यादिवशी त्यांचे स्मरण केले जाते.

 

maharashtra din
महाराष्ट्र दिवस

Happy Maharashtra Din History महाराष्ट्र निर्मितीसाठी संघर्ष :

आपला भारत देश स्वतंत्र तर झाला परंतु ब्रिटीशांनी विभाजन हे वेगवेगळ्या प्रांतात केले होते, परंतु देशातील प्रमुख नेत्यांनी असा विचार मांडला होता कि हे विभाजन भाषावार असावे.
विठ्ठल वामन ताम्हणकर यांनी भाषावर प्रांत करण्यात यावा हा विचार“लोकशिक्षण” या मासिकातून मांडला होता.

नेत्यांची असा विचार होता कि विविध भागात गेलेली मराठी जनता एकत्रित येऊन एक स्वतंत्र प्रांत व्हावा.

महात्मा गांधींनी १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात हा मुद्दा मान्य देखील करण्यात आला होता.
भारत स्वतंत्र झाला होता त्यावेळेस हा विचार नेहरूंना मान्य नव्हता.

नेहरूंना असे वाटत होते कि आपण या विचारावर जर सहमत झालो तर राष्ट्रीय एकात्मतेला धोका होऊ शकतो.

१९४० मध्ये गजानन माडखोलकर यांनी महाराष्ट्र एकत्र करण्याचा विषय मांडला त्यांनी उद्योग व्यापार हे लोकांच्या नियंत्रणाखाली नाहीत असे म्हणत काँग्रेस च्या पुढाऱ्यावर टीका केली.
१९४६ मध्ये माडखोलकर साहित्य संमेलन अध्यक्षपदी त्यांनी “संयुक्त महाराष्ट्र समिती” स्थापन केली.
संयुक्त महाराष्ट्राचा ठराव हा १२ मे १९४६ मांडण्यात आला.

शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या सर्वांच्या मागणीला प्रेरणा देण्यासाठी सर्वपक्षीय एकीकरण परिषद भरवण्यात आली होती.

दार कमिशन व जे. व्ही पी कमिटी यांना असे वाटत होते कि ,

भाषावार प्रांत रचना हि योग्य बाब नाही असे म्हणत देशाच्या एकात्मतेवर गंभीर परिणाम होईल त्यासाठी त्यांनी आयोगाची मागणी मान्य केली नाही.

१९५३ मध्ये फाझल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनररचना आयोगाची निवड करण्यात आली.
जी संयुक्त महाराष्ट्राची समिती होती त्यामध्ये धनंजय गाडगीळ एस. एम जोशी यांनी त्याचे स्वरूप मांडले.

यामध्ये एक हैद्राबाद चे उदाहरण ठेऊन डोळ्यासमोर दाखवून दोन भाषेत लिहिलेले तत्व हे अस्वाभाविक आहे.

वरील आयोगाचा निर्णय १९५५ मध्ये जाहीर झाला.

या सर्व गोष्टीतून गुजराती आणि मराठी व्यक्तीचा विरोध नमवायचा असा बेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.

या प्लॅन मध्ये आपली मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे चिन्ह दिसताच मराठी लोकात असंतोष निर्माण झाला.

आणि येथून पुढे खरा संयुक्त महाराष्ट्र घडवण्याचा कडा संघर्ष सुरु झाला.

शाहीर अमर शेख ,प्रबोधनकर ठाकरे ,आचार्य अत्रे, सेनापती बापट , श्रीपाद डांगे , या काही नेत्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात चळवळ सुरु झाली.

संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी मोठ्या संखेने मोर्चे हे फ्लोरा फाउंटन येथे जमले आणि सर्वांच्या मुखात फक्त एकच घोषणा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.

हे आंदोलन काही दिवसात मोठे  झाले त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मुरारजी देसाई यांनी गोळीबाराचा आदेश दिला

त्यामध्ये महाराष्ट्रातील १०७ कार्यकर्त्यांनी आपला जीव गमावला.

हे आंदोलन अजून भडकले ते पाहता इंदिरा गांधींनी नेहरूजींना समजूत घालून संयुक्त महाराष्ट घडवण्याची संमती दिली.

नेहरूंना असे वाटत होते कि या राज्याचे नाव मुबई असावे परंतु हे राज्य संतांचे व देवी देवतांचे ,

बलिदानाची भूमी म्हणून यास महाराष्ट्र नाव देण्यात आले.

खास गोष्ट म्हणजे हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

maharashtra din १ मे १९६० महाराष्ट्राची मागणीस मान्यता मिळली आणि हे यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते दिलीतून महाराष्ट्र स्थापनेचा कलश आणला गेला.

आणि महाराष्टाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यात आली.

 

 

कडा संघर्ष :

२१ नोव्हेंबर १९५६ फ्लोरा फाउंटनच्या भागात तणावाचे वातारण होते .

राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचा नकार दिला तेव्हा सर्व भागातून विरोध झाल.

विवेकशून्य सरकारचा विरोध करण्यासाठी एक भव्य असा मोर्च्या येणार होता, मुंबईमधील गिरणी कामगाराची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्च्या निघाला.

हे पाहता फोर्ट भागात जमाव आणि सभा  बंदी करण्यात आलू होती. हे सर्व पाहता कार्यालयातील महिलांना सुट्टी देण्यात आली होती.

फोर्ट या भागात बंदी केली होती परंतु त्यांनी त्या बंदिस ना घाबरता फ्लोरा फाउंटनच्या चौकात सर्वजण ठाम मतांनी बसले.

मुरारजी देसाई यांच्या सांगण्यावरून लाठीचार्जे केला अतोनात प्रयत्न  केले परंतु कोण्ही त्याठिकाणचे हलले नाहीत हे पाहत,

तत्कालीन मुख्यमंत्री मुरारजी देसाई यांनी गोळीबार करण्याचे आदेश दिले तरीसुद्धा महाराष्ट्रातील हि मंडळी घाबरली परंतु त्या गोळीबारात १०६ लोक मरण पावले.

हे १०६ लोकांचे बलिदान पाहून महाराष्ट्र जस पेटला तेव्हा १ मे १९६० ला मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र स्थापन करावा लागला.

 

maharashtra din wishes in marathi:

आपण हे विशेष मोबाइल वर शुभेच्या देण्यासाठी पाठवू शकता.

१. "भारत देश महान

महाराष्ट्र स्वाभीमान

आमची शान"

!!महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्या!!

 

२. "संतांची भूमी

महाराष्ट्ट्र भूमी"

!!महाराष्ट्र स्थापन दिनाच्या हार्दिक शुभेच्या!!

 

३.  "देशाला प्रगती पथावर नेऊ

महाराष्ट्राचे नाव कमवू

आणि हुतात्म्यांचे बलिदान

स्मरणात ठेऊ"

!!महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या!!

 

४. "सुवर्ण दिवशी वंदन

माझे महाराष्ट्र देशाला"

!!महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्या!!

 

५. "आनंदी देशा

प्रगतीच्या देशा

महाराष्ट्र देशा"

!! महाराष्ट्र स्थापना दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या!!

 

६. "दगड झालोच तर सह्यद्रीचाच होईन

माती झालो तर महाराष्ट्राचीच होईन

तलवार झालो तर नक्की भवानीची होईन"

!!महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या!!

 

७. "संतांची भूमी

पवित्र भूमी

महाराष्ट्र भूमी"


maharashtra din
महाराष्ट्र दिन 


maharashtra din हुतात्म्यांची नावे :

  1. बाबू हरी दाते
  2. जोसेफ डेव्हिड पेजारकर
  3. महमद अली
  4. यशवंत बाबाजी भगत
  5. पी. एस. जॉन
  6. मुनशी वझीऱअली
  7. सत्तू खंडू वाईकर
  8. शंकर खोटे
  9. अनुप माहावीर
  10. रामचंद्र लक्ष्मण जाधव
  11. शरद जी. वाणी
  12. वेदीसिंगबिर्मिती
  13. रामचंद्र भाटीया
  14. गजानन ऊर्फ बंडू गोखले
  15. परशुराम अंबाजी देसाई
  16. निवृत्ती विठोबा मोरे
  17. आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
  18. बालप्पा मुतण्णा कामाठी
  19. गणपत रामा तानकर
  20. रघुनाथ सखाराम बीनगुडे
  21. धोंडू लक्ष्मण पारडूले
  22. तुकाराम धोंडू शिंदे

  23. पांडूरंग धोंडू धाडवे
  24. भास्कर नारायण कामतेकर
  25. विष्णू सखाराम बने
  26. गोपाळ चिमाजी कोरडे
  27. पांडूरंग बाबाजी जाधव
  28. माधव राजाराम तुरे
  29. सिताराम बनाजी पवार
  30. धर्माजी गंगाराम नागवेकर
  31. सिताराम गणपत म्हादे
  32. सुभाष भिवा बोरकर
  33. सिताराम गयादीन
  34. गोरखनाथ रावजी जगताप
  35. चिमणलाल डी. शेठ
  36. तुळशीराम पुंजाजी बेलसरे
  37. देवाजी सखाराम पाटील
  38. शामलाल जेठानंद
  39. सदाशिव महादेव भोसले
  40. भिकाजी पांडूरंग रंगाटे
  41. गुलाब कृष्णा खवळे
  42. वासुदेव सुर्याजी मांजरेकर
  43. भिकाजी बाबू बांबरकर
  44. सखाराम श्रीपत ढमाले
  45. नरेंद्र नारायण प्रधान
  46. ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
  47. दत्ताराम कृष्णा सावंत
  48. बबन बापू भरगुडे
  49. सिताराम धोंडू राडये
  50. विठ्ठल गंगाराम मोरे
  51. रामा लखन विंदा
  52. के. जे. झेवियर
  53. विनायक पांचाल
  54. एडवीन आमब्रोझ साळवी
  55. रामचंद्र सेवाराम
  56. दौलतराम मथुरादास
  57. वसंत द्वारकानाथ कन्याळकर
  58. विठ्ठल दौलत साळुंखे
  59. रामनाथ पांडूरंग अमृते
  60. लक्ष्मण गोविंद गावडे
  61. धोंडू रामकृष्ण सुतार
  62. मुनीमजी बलदेव पांडे
  63. सीताराम दुलाजी घाडीगावकर
  64. मारुती विठोबा म्हस्के
  65. भाऊ कोंडीबा भास्कर
  66. धोंडो राघो पुजारी
  67. ह्रुदयसिंग दारजेसिंग
  68. पांडू माहादू अवरीरकर
  69. शंकर विठोबा राणे
  70. विजयकुमार सदाशिव भडेकर
  71. कृष्णाजी गणू शिंदे
  72. रामचंद्र विठ्ठल चौगुले
  73. धोंडू भागू जाधव
  74. भाऊ सखाराम कदम
  75. काशीनाथ गोविंद चिंदरकर
  76. चुलाराम मुंबराज
  77. बालमोहन
  78. अनंता
  79. गंगाराम विष्णू गुरव
  80. कमलाबाई मोहिते
  81. रत्नु गोंदिवरे
  82. सय्यद कासम
  83. गोविंद बाबूराव जोगल
  84. अनंत गोलतकर
  85. किसन वीरकर
  86. सुखलाल रामलाल बंसकर
  87. पांडूरंग विष्णू वाळके
  88. फुलवरी मगरु
  89. बाबूराव देवदास पाटील
  90. लक्ष्मण नरहरी थोरात
  91. शंकर गोपाल कुष्टे
  92. गणपत रामा भुते
  93. बाबा महादू सावंत
  94. विठ्ठल नारायण चव्हाण
  95. मधूकर बापू बांदेकर
  96. रावजीभाई डोसाभाई पटेल
  97. होरमसजी करसेटजी
  98. गिरधर हेमचंद लोहार
  99. करपैया किरमल देवेंद्र
  100. गंगाराम गुणाजी
  101. शंकरराव तोरस्कर
  102. मारुती बेन्नाळकर
  103. देवजी शिवन राठोड
  104. घनश्याम बाबू कोलार
  105. महादेव बारीगडी
  106. भिकाजी दाजी
  107. गणपत श्रीधर जोशी

 

maharashtra din तर आपला महाराष्ट्र मुंबई सह बनवण्यासाठी असा काटक संघर्ष झाला होत आणि त्यात १०७ लोकांचे प्राण गेले होते आणि आपला महाराष्ट्र मुबईसह स्वतंत्र झाला.

Post a Comment

Previous Post Next Post