१. सांबर सरोवर : सांबर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर/लेक आहे.

सांबर लेक हे भारताच्या राजस्थान राज्यातील जयपूर जिल्ह्यात आहे व हे सरोवर जयपूरपासून पश्चिमेस ९६ किलोमीटर आणि अजमेरपासून (northeast) ६४ किमी अंतरावर आहे.

हे सरोवर समुद्रसपाटीपासून १२०० फुट उंचीवर आहे. त्या सरोवरात  मेंठा,रूपनगड, खारी, खंडेला या चार नद्यां समाविष्ट होतात. तेव्हा  भरल्यावर त्याचे क्षेत्रफ़ळ हे  ९० चौरस मैल होते.

या सरोवराची लांबी हि ३५.५ किमी रुंदी ३ ते ११ किमी आहे आणि सांबर सरोवराचा परीघ ९६ किमी असून त्याचा आकार हा लंबवर्तुळाकार आहे.

सांबर सरोवराला अरवली डोंगररांगांनी चार हि बाजूनी वेढले आहे.

पाणलोट क्षेत्र: ५७०० किमी.

पृष्ठभागाचे क्षेत्रफळ: १९० ते २३० किमी


विषय सूची 
  1.  भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर सांबर सरोवर (मीठ) निर्मिती
  2. जागतिक महत्व
  3. भारतातील खाऱ्या पाण्याची सरोवरे : (Important salt lake in India)
  4. भारतातील महत्वाची सरोवरे 
  5. FAQ Question and answer


हे वाचावे :-भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर.


bharatatil sarvat mothe khaarya panyache sarovar


#भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर सांबर सरोवर (मीठ) निर्मिती:

  • खाऱ्या जमिनीपासून काढलेले मीठ म्हणजेच सांबर मीठ.
  • हजारो वर्षांपासून हे सरोवर उत्पादनात प्रसिद्ध आहे त्यामुळे देशात राजस्थानचा मीठ उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो.
  • सांबर सरोवराचे दोन भाग हे वालुकाश्मात बांधलेल्या ५·१ किमी. लांबीच्या धरणामुळे पडले आहेत.
  • सरोवराचे खारे पाणी हे सांद्रण स्थितीत  पोहचले जाते तेव्हा ते पश्चिम भागात असलेले पाणी पूर्व भागात सोडले जाते.
  • सांबर धरणाच्या सरोवराच्या पूर्व भागात भाष्पीकरण करणारे डबक्यात ते पाणी सोडले जाते आणि मिठाचे उत्पादन घेतले जाते.
  • सरोवराचा पूर्व भागाचे क्षेत्रफळ हे ८० चौरास किलोमीटर आहे.
  • पूर्वभागातच पाण्याचे डबके आणि  मिठागरे व मीठ प्रक्रिया केंद्र आहे.
  • मीठ उत्पादन घेण्याचे काम हे इसवी.१५०० पासून सुरु आहे.
  • मीठ उत्पादनाचे अधिकार हे पहिले स्थानिक लोकांकडे होते.
  • स्थानिक लोकांकडून हे अधिकार राजपूत, मोगल, ब्रिटिशराजवटी पासून शेवटी सांभर सॉल्ट लि. कंपनी कडे गेले.
  • राजस्थानमध्ये जोधपूर व जयपूर हे दोन संस्थान होते त्यांनी १८७० मध्ये त्याचे पूर्ण अधिकार ब्रिटिश सरकारकडे देण्यात आले व ब्रिटिश सरकार कडून दरवर्षी ७ लाख रुपये जयपूर आणि जोधपूर या संस्थानांना मिळत होते.
  • परंपरागत जि पद्धती होती जवळ जवळ बंद जाहली होती.
  • सांबर सरोवरातून प्रत्येकवर्षी  कमीत कमी दोन लक्ष टन आणि जास्तीत जास्त अडीच टन इतक स्वच्छ मिठ उत्पादन होत.
  • देशातील एकूण मीठ उत्पादनाच्या सुमारे ९ % इतके हे प्रमाण आहे.
  • या सरोवरांभोवती २८ गाव आहेत.
  • सांबर सरोवरापासून नेआण करण्यासाठी लोहमार्ग देखील आहे आणि मिठाची साठवण करून रेल्वेने पाठवले जाते.

 

sarvat mothe khaarya panyache sarovar


#जागतिक महत्व :

  • सांबर सरोवराला जागतिक(Global) महत्व सुद्धा आहे.
  • दरवर्षी हिवाळ्यात उत्तर आशियातून फ्लेमिंगो व इतर हजारो पक्षी स्थलांतर करून येतात.
  • सांबर सरोवराचा परिसर हा "रामसर परिसर" म्हणून घोषित करण्यात आला आहे.

 

bharatatil sarvat mothe khaarya panyache sarovar


#भारतातील खाऱ्या पाण्याची सरोवरे : (Important salt lake in India)

सरोवर
चिल्का सरोवर ओडिसा
लोणार सरोवर महाराष्ट्र
सांबर सरोवर राजस्थान
त्सासोमारी सरोवर जमू काश्मीर
पुलिकत सरोवर आंध्रप्रदेश
अबुसाई सरोवर लडाख (भारताचा केंद्रशासित प्रदेश)
वेंबनाड सरोवर केरळ


चिल्का सरोवर :  चिल्का सरोवर ओडिसा राज्यात आहे. 

  • भारत देशाच्या ओडिसा राज्यातील सर्वात मोठे व प्रसिद्ध सरोवर आहे. ओडिसा राज्यातील पुरी ,खुर्दा आणि गंजम या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.
  • हे जगातील दुसऱ्या नंबरचे  खाऱ्या  पाण्याचे सरोवर  आहे.
  • या सरोवराचे क्षेत्रफळ हे ११६५ km² आहे.
  • चिल्का सरोवर लांबी ७० आणि रुंदी ३० किलोमीटर
  • मह्त्वाचे म्हणजे या तलावात डिसेंबर पासून ते जून पर्यंत त्याचे पाणी हे खारे राहते आणि पावसाळ्यात पाणी गोड राहते.
  • चिल्का सरोवराची खोली सरासरी ३ मीटर आहे.
  • चिल्का तलाव का प्रसिद्ध आहे?या सरोवरा माश्यांच्या २२५ प्रजाती आहेत आणि हिवाळयात मोठ्या प्रमाणात पक्षी स्थलांतर करून येतात.
  • पुरीपासून चिल्का सरोवर ३७ किलोमीटर लांब आहे.
  • गंजम जिल्ह्यांपासून चिल्का सरोवर हे ८७.४ किलोमीटर लांब आहे.

 

लोणार सरोवर : लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात आहे.

  • या सरोवरची निर्मिती हि उल्कापातामुळे झाली.
  • बुलढाणा या जिल्ह्यापासून लोणार सरोवर हे ९१.६किलोमीटर आहे.
  • लोणार सरोवरात महत्वाचे म्हणजे येथे अखंड वाहत राहणारी धार आहे आणि त्या ठिकाणी पर्यटक आणि भाविकांची गर्दी असते.
  • अखंड वाहत राहणारी धार हि काशी तीर्थावरून येते हे लोकांची धारणा /समज आहे.
  • लोणार सरोवर ची खोली १३७ मी आहे.

 

त्सासोमारी सरोवर : जम्मू -काश्मीर

 

पुलिकत सरोवर : आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्याच्या सरहद्दीवर हे पुलिकत सरोवर आहे.

  • सरोवराची लांबी ५० किमी आणि रुंदी ३ ते १८ किमी आणि सरासरी खोली ३ फूट आहे.
  • हे सरोवर तामिळनाडूच्या ६० किमी लांब आहे.
  • त्याचे सरोवराचे मोजमाप ७५९चौरस किलोमीटर आहे.
  • पुलिकत सरोवराला पावसाळ्यात  कलंगी ,स्वर्णमुखी आणि अरणी या तीन प्रमुख नद्यांमधून गोडे पाणी मिळते.
  • Pulicat तलाव आपल्याला चेन्नई सुलूरपेट रेल्वेस्टेशन पासून १० किलोमीटर अंतरावर आहे.
  • येथील अभयारण्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च या महिन्यात जावे. कारण वातावरण हे सौम्य आणि  फ्लेमिंगो पक्षी सुद्धा पाहण्यास मिळतील.

 

अबुसाई सरोवर : अबुसाई सरोवर हे लडाख मध्ये आहे.

 

वेंबनाड सरोवर : वेंबनाड हे सरोवर  केरळ मध्ये स्थित आहे, पिकनिक स्पॉट.

  • केरळ पासून वेंबनाड सरोवर हे १७५.० किलोमीटर आहे.
  • भारतातील सर्वात जास्त लांबीचे सरोवर आहे.
  • वेंबनाड सरोवराची लांबी ९६ किमी आणि रुंदी १४ किमी आणि खोली १२ मीटर आहे.
  • पृष्ठभागाचे क्षेत्रफळ २,०३३ चौ. किमी.

 

भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे सांबर आहे.

#भारतातील महत्वाची सरोवरे :

१. जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दाल सरोवर , वूलर सरोवर , सुरज ताल , पॅंगॉन्ग हे महत्वाची सरोवरे आहेत.

२. उत्तराखंड : उत्तराखंड मधील भीमताल  , नैनिताल , रामकुंड , सातरसाल , मातवताल , नौकुचियाताल , पुनाताल हि सरोवरे आहेत.

३. हिमाचल प्रदेश : रेणुका सरोवर , खोजीहार सरोवर , चुंद्रताल , नाको सरोवर 

४. तामीळनाडू : कलीदेवी सरोवर

५. राजस्थान : राजस्थानमध्ये ढेंबर सरोवर ,सांबर सरोवर , पुष्कर सरोवर 

६. आंध्रप्रदेश : पुलिकत सरोवर

७. ओडिसा : चिल्का सरोवर 

८. केरळ : संस्थम कोट्टा सरोवर , वेम्बनाड सरोवर , अष्टमुडी सरोवर 

९. ईशान्य भारत :  रामसार सांकेतानुसार आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश , लोकटक सरोवर (तरंगते सरोवर)

१०. सिक्कीम : त्सगमो सरोवर , खेचोपलरी सरोवर सिक्कीम मध्ये हे दोन सरोवर आहेत.

 

pangong lake in jammu and kashmir
Pangong lake


आपण आता खालच्या बाजूस सर्वात महत्वाचे आणि सतत विचारले जाणारे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

#FAQ Question and answer :

प्रश्न १. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर?

उत्तर: सांबर /राजस्थान


प्रश्न २. महाराष्ट्रातील प्रसिद्ध सरोवर कोणते?

उत्तर : लोणार /बुलढाणा महाराष्ट्र


प्रश्न ३. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर : ओडिसा


प्रश्न ४. महाराष्ट्रात उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर कोणते ?

उत्तर : लोणार


प्रश्न ५. महाराष्ट्रात सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर... आहे ?

उत्तर : लोणार


प्रश्न ६. आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू  असलेले सरोवर कोणते ?

उत्तर : पुलिकत सरोवर


प्रश्न ७. वेंबनाड सरोवर कोणत्या राज्यात आहे?

उत्तर : केरळ


प्रश्न ८. अबुसाई सरोवर कोठे आहे ?

उत्तर : लडाख


प्रश्न ९. त्सासोमारी सरोवर कोठे आहे?

उत्तर : जम्मू- काश्मीर


प्रश्न १०. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?

उत्तर : पुलिकत सरोवर


प्रश्न ११. जगातील सर्वात खोल सरोवर ?

उत्तर :  बैकाल सरोवर/सायबेरिया


प्रश्न १२. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?

उत्तर : बैकल


प्रश्न १३. भारतातील सर्वात मोठे गोड पाण्याचे सरोवर?

उत्तर : वुलर


प्रश्न १४. भारतातील वुलर सरोवर कोठे आहे ?

उत्तर :  जम्मू व काश्मीर


प्रश्न १५. आशियातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव?

उत्तर : नासिर तलाव


प्रश्न १६. आशियातील दुसरा कृत्रिम तलाव कोणता?

उत्तर : जयसमंद सरोवर

 

 

Post a Comment

Previous Post Next Post