अंकगणित मध्ये आपण lasavi masavi हा कसा काढावा ते पाहणार आहोत ankganit मध्ये लसावि मसावि कसा काढावा सरळ पद्धतीने कसा काढावा हे ही पाहू.

 

lasavi masavi
लसावि मसावि 

मसावि लसावि काढत असताना तुम्हाला सर्व सूत्रे मिळणार नाहीत तर आपण ती सर्व सूत्र या ब्लॉग मध्ये देणार आहोत. दिलेल्या सूत्रानुसार आपणास सर्व लसावि मसावि वरील प्रश्न सोडवण्यास सोपे होईल.

लसावि मसावि मधील ११ सूत्र वापरून आपण सर्व प्रकराची मसावि लसाविची प्रश्न सोडवू शकतो.


#मसावि लसावि (lasavi masavi)कसा काढावा

 

Let's see


मसावि काढणे :(महत्तम सामाईक विभाज्य )

मसावि(HCF) म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो.म्हणजेच दिलेल्या सर्व संख्यांना भाग जाणारी त्यापेक्षा दुसरी मोठी संख्या नसते.

 

उदा, १२,२४,३२

 

             १२ ,२४, ३२

 

उदा, दिलेल्या तीन संख्यांना २ ने किंवा ४ ने भाग जातो तर मसावि हा ४ असेल.

 

*महत्वाच्या मसावि अटी:

  1. दिलेल्या सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग द्यावा.
  2. मसावि हा दिलेल्या संख्येतून सर्वात लहान संख्या किंवा त्यापेक्षा लहान असते.
  3.  ३०, ३२, ३४, ३६ या क्रमवार संख्येचा मसावि हा नेहमी इतका असतो.
  4. नैसर्गिक संख्या ,क्रमवार विषम संख्या , मूळ संख्या किंवा सहमुळ संख्या यांचा मसावि नेहमी इतका असतो/

 

 

महत्वाची सूत्रे :

  1.  पहिली सं. ×दु. संख्या = मसावि ×लसावि
  2.  दोन संख्याचा गुणाकार =लसावि ×मसावि
  3.  पहिली संख्या = दोन संख्याचा गुणाकार /दुसरी संख्या
  4.  दुसरी संख्या = लसावि ×मसावि /पहिली संख्या
  5.  लसावि = दोन संख्याचा गुणाकार / मसावि
  6.  मसावि = दोन संख्याचा गुणाकार / लसावि
  7.  Apurnakacha masavi = अंशाचा मसावि / छेदाचा लसावि
  8.  अपूर्णांकाचा लसावि = अपूर्णांकाचा लसावि / अपूर्णांकाचा मसावि
  9.  @दोन संख्यातील असामायिक अवयवांचा गुणाकार = लसावि / मसावि
  10.  दोन संख्यापैकी लहान संख्या = मसावि × लहान असामायिक अवयव
  11.  दोन संख्यापैकी मोठी संख्या = मसावि × मोठा असामायिक अवयव

 

 

लसावि काढणे: (लघुत्तम सामाईक विभाज्य)

लसावि (LCM) म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो म्हणजेच दिलेल्या सर्व संख्या भाग जाणारी त्यापेक्षा दुसरी लहान संख्या नसते.

 

 

महत्वाच्या लसावि अटी:

  1. दिलेल्या संख्येतील कमीत कमी दोन संख्यांना एकाच संख्येने भाग घाला.
  2. दोन क्रमवार नैसर्गिक संख्या ,क्रमवार विषम संख्या ,मूळ संख्या ,सहमुळं संख्या यांचा गुणाकार म्हणजेच लसावि असतो.
  3. लसावि हा दिलेल्या संख्येतील सर्वात मोठी संख्या किंवा त्यापेक्षा मोठी संख्या

 

 

*उदाहरणे (lasavi masavi) :

 

Q १. दोन संख्याचा लसावि १९२ व मसावि १६ आहे तर त्यापैकी एक संख्या ६४ असल्यास दुसरी संख्या किती ?

 

====>

पहिली संख्या × दुसरी संख्या = लसावि × मसावि

 

६४ × x  =  १६ × १९२

 

x =  १६×१९२/  ६४

 

x = ४८

 


 

Q २. दोन संख्याचा गुणाकार ४३३५ असून त्यांचा लसावि २५५ आहे, तर त्यांचा मसावि किती ?

 

====>

दोन संख्याचा गुणाकार  = लसावि ×मसावि

 

४३३५  = २५५×x

 

४३३५/२५५

 

   मसावि = १७


 

Q ३. दोन संख्याचा मसावि आणि लसावि अनुक्रमे ५ व २४० येतो तर दोन संख्यापैकी एक संख्या १५ असेल तर दुसरी संख्या कोणती असेल?

 

====>

पहिली संख्या × दुसरी संख्या = मसावि × लसावी

 

१५×x  = २४० ×५

 

= २४० × ५/ १५

 

  दुसरी संख्या = ८०


 

Q ४. दोन संख्या ६x व ८x  असून  त्याचा मसावि १४ आहे व लसावि १६८ आहे, तर त्या संख्या कोणत्या?

 

====>

 

६x × ८x =  १४ × १६८

 

= १४ × १६८/ ६x × ८x

 

= ७ × ७

 

x २  =  ४९

 

 x = ७

 


 

Q ५. दोन संख्याचा मसावि ६ व लसावि १६८ आहे तर त्या दोन संख्या कोणत्या?

 

====>

पहिली संख्या × दुसरी संख्या = लसावि × मसावि

 

लसावि  / मसावि = भाग ----> असामाईक अवयव

 

लहान संख्या = मसावि × लहान संख्या अवयव

 

मोठी संख्या = मसावि ×अ. मोठी संख्या

 

१६८/ ६ = २८ ---अवयव ----> ४ × ७

 

लहान संख्या = ६ × ४ = २४

 

मोठी संख्या = ६ × ७ = ४२

 

दोन संख्या = २४, ४२

 


*गुणोत्तर प्रमाणात लसावि मसावि काढणे :

 

Q ६. दोन संख्येचे गुणोत्तर ४:५ आहे त्यांचा मसावि ८ आहे , तर त्याचा लसावि किती?

 

====>

४ या प्रमाणे मसावीला गुणल्यास

 

लसावि = मसावि × गु. प्रमाणाचा गुणाकार

 

= ८ ×  २०

 

लसावि   = १६०


 

Q ७. दोन संख्येचे गुणोत्तर ३:४ आहे आणि त्यांचा मसावि ४आहे तर त्याचा लसावि काढा?

 

====>

लसावि = मसावि × गु. प्रमाणाचा गुणाकार

 

गु. प्रमाणाचा गुणाकार = ४ × ३ = १२

 

= १२ × ४

 

लसावि = ४८


 

Q ८. दोन अंकी दोन संख्याचा मसावि १५ असून लसावि हा मसावीच्या १५ पट आहे, तर त्या संख्या कोणत्या?

 

====>

पहिले पट काढणे = १५ × १५

= २२५  = २२५/ १५

 

= १५

 

असामाईक अवयव = ५ ×३

 

लहान संख्या =  ३ × १५ = ४५

 

                         मोठी संख्या = ५ × १५ = ७५

 


 

Q  ९. दोन अंकी दोन संख्याचा मसावि २४ असून लसावि हा मसावीच्या ६ पट आहे , तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?

 

====>

पट काढून घेणे

२४ × ६ = १४४

 

१४४/ २४= ६

 

असामाईक अवयव = २×३

 

मोठी संख्या = २४ ×३

= ७२

 

लहान संख्या = २४ ×२

=  ४८

 


 

लसावि मसावि (lasavi masavi) या भागात आपण ११ प्रकारची सूत्रे पाहिली आणि त्यावरील उदाहरणे देखील पाहिली लसावि मसावि कसा काढावा याची काही शंका येत असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

 

Post a Comment

Previous Post Next Post