भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे आणि भारतातील टॉप १० पर्वत शिखर या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.

इंडिया भारतातील उंच शिखर व त्याची उंची किती (bharatatil sarvat unch shikhar tyachi unch)ते कोणत्या राज्यात आहे.

त्या शिखराचे राज्य आणि ते कोणत्या भागात आहे आणि त्या राज्यातील सर्वात महत्वाची पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे किती आहेत हे हि पाहणार आहोत.

 

भारतातील सर्वात उंच शिखर

 

 

भारतातील सर्वात उंच शिखर टॉप १० यादी:

१.. कांचनगंगा

२. नंदा देवी शिखर

३. कामेट शिखर

४. साल्तोरो शिखर

५.  ससेर कांगरी शिखर

६. मोस्तोंग कांगरी शिखर

७. ससेर कांगरी II शिखर

८. ससेर कांगरी III शिखर

९. तेरम कांगरी I शिखर

१०. जोंगसोंग शिखर

 

 

१. कांचनगंगा (सिक्कीम , भारत):

भारतातील सर्वात उंच शिखर
कांचनगंगा 


(kanchaganga) कांचनगंगा हे पर्वत शिखर भारतातील हिमालय पर्वतातील सर्वोच शिखर आहे. हे भारतातील सिक्कीम आणि नेपाळ यांच्या सीमेवर आहे. हे भारतातील पर्वत शिखर त्याची उंची ८५८६मीटर इतकी आहे , आणि फुटामध्ये उंची  हि २८१६९.२९ फूट आहे.

जगातील माउंट एव्हरेस्ट आणि केटू (K2) या दोन पर्वत शिखरानंतर तिसरा क्रमांक हा हिमालयातील पर्वतरांगेतील कांचनगंगा पर्वत शिखर लागते.

भारतातील कांचनगंगा या पर्वत शिखरावर २५ मे १९५५ मध्ये ज्यो ब्राऊन आणि जॉर्ज ब्रँड यांनी पहिली चढाई केली होती.

 

हिमालय पर्वत रांगेतील कांचनगंगा हे शिखर दार्जिलिंग पासून ७४.४ किलोमीटर आहे.

 

 

सिक्कीम मधील पाहण्याजोगे:

तुम्ही जर सिक्कीम ला गेलात तर तुमची हि ट्रिप अगदी पैसे वसूल होणार आहे, का त्याठिकाणी पाहण्यासारखे भरपूर ठिकाणे आहेत.

जसे कि ,युक्सोम, गंगाटो, नाथूला दरा, सोग्मो लेक, रुमटेक मोनास्ट्री, पेलिंग,युमथंग घाट, हे पर्यटन स्थळे नक्कीच पाहण्याजोगी आहेत.

 

 

 

 

२. नंदा देवी शिखर (चमोली उत्तराखंड ,भारत):

(Nanda Devi) नंदा देवी हे पर्वत शिखर भारताच्या उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात आहे.

चमोली जिल्ह्यातील नंदा देवी पर्वत शिखर ७८१७ मीटर इतके आहे.

हे पर्वत शिखर जगातील २३ वे सर्वोच पर्वत शिखर आहे.

भारतातील दुसरे सर्वोच शिखर नंदा देवी हे आहे.

हिमालय पर्वत रांगेत पश्चिमेला ऋषीगंगा खोरे व पूर्वेला गौरीगंगा खोऱ्यांमध्ये वसलेले आहे.

 

 

उत्तराखंड मुख्य पर्यटनस्थळ (Top Tourist Places Uttarakhand):

उत्तराखंड मधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ नैनिताल , आकर्षक स्थळ मसुरी ,  धार्मिक स्थळ केदारनाथ, सुंदर ठिकाण ऋषिकेश , अद्भुत सुंदर स्थळ बद्रीनाथ, रामनगर ,दर्शन स्थळ हरिद्वार, लहान मुलांसाठी जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, प्रसिद्ध तीर्थ स्थळ गंगोत्री,रानीखेत ,घांगरिया,

फिरण्यासाठी पिथोरागड, प्रसिद्ध पर्यटनस्थळ यमुनोत्री, भीमताल , नैसर्गिक सुंदरता स्थळ कौसानी, आकर्षण स्थळ अल्मोडा,उत्तराखंड राजधानी देहरादून, सुंदर स्थळ मुक्तेश्वर, दुसरे स्वित्झर्लंड औली, धानोलटि, फुलाची घाटी,

 

 

३. कामेट शिखर (उत्तराखंड,भारत):

हे पर्वत शिखर उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात तिबेटच्या सीमे लगत वसलेले आहे.

भारतातील कामेट शिखर हे नंदा देवी नंतर भारतातील सर्वात उंच शिखर येते हे शिखर भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे आहे.

कामेट शिखर हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच शिखर येते.

कामेट पर्वत शिखर याची उंची ७७५६ मीटर इतकी आहे.

या शिखराचा जगात उंचीच्या यादीत २९ वा क्रमांक लागतो.

कामेट शिखराची नैसर्गिक खासियत अशी आहे कि, हे पिरॅमिड सारखे दिसते.

तिबेटी लोक त्यांच्या भाषेत या पर्वतास कांगमेड पर्वत म्हणतात.

 

 

४. साल्तोरो शिखर (जम्मू काश्मीर, भारत):

saltoro पर्वतरांगा जम्मू काश्मीर आणि पाक प्रशासित गिलगीट बलुचिस्तान प्रदेशाच्या सिमेवर आहे.

३१ सावे जगातील सर्वात उंच शिखर सल्टोरो शिखर आहे.

साल्तोरो शिखराची उंची ७७४२ मीटर इतकी आहे.

हे शिखर पश्चिमेला सियाचीन ग्लेशर मध्ये वसलेलं आहे.

 

Best places visit Jammu-Kashmir जम्मू-काश्मीर पर्यटनस्थळ:

वैष्णव माता मंदिर ,जम्मू , पटनीटॉप, पुलवामा, पहलगाम, गुलमर्ग, लेह लदाख, श्रीनगर, सोनमार्ग, कत्रा, दाचीगाम नॅशनल पार्क.

 

 

५.  ससेर कांगरी शिखर (लद्दाख,भारत):

Saser कांगरी १ या शिखराची उंची ७६७२ मीटर इतकी आहे.

कांगरी शिखर हे भारताच्या उत्तरेकडील लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे.

ससेर कांगरी हे शिखर जगात उंचीत ३५ साव्या क्रमांकावर आहे.

लडाख ची राजधानी आणि प्रमुख नगर लेह हे आहे.

१९७३ मध्ये ससेर कांगरी १ वर यशस्वी चढाई केलेले व्यक्ती :- दा तेनझिंग, थोंडुप ,दावा नोरबू आणि  निमा तेन्झिन हे होते.

 

 

लदाख,भारत पर्यटनस्थळ Tourist attractions ladakh:

लदाख , स्टोक म्यूझियम ,पॅंगॉन्ग, मॅग्नेटिक हिल, मोरिरी, शांती स्तूप, नुब्रा व्हॅली, खरदूंगला, गुरुद्वारा पठार साहेब, लेह, थिकसे मोनास्टेरी ,स्टोक मोनास्टेरी, लेह-मनाली हायवे, अल्ची मोनास्टेरी चोसखोर. हे भारतातील लदाख मधील सुंदर पर्यटनस्थळे आहेत.

कधी काळी गेलात तर या स्थळांना नक्की भेट द्या.

 

 

 

६. मामोस्तोंग कांगरी शिखर (लद्दाख, भारत):

मामोस्तोंग हे शिखर लडाख मध्ये आहे आणि या शिखराची उंची हि ७५१६  मीटर इतकी आहे.

सहाव्या क्रमांकाचे भारतातील सर्वात उंच शिखर आहे आणि जगात उंचीत ४८ व्या क्रमांकावर आहे.

भारतातील मोमोस्तोन्ग कांगरी या पर्वतावर पहिली चढाई १३ सप्टेंबर १९८४  मध्ये केली गेली होती.

 

 

७. ससेर कांगरी II शिखर (लद्दाख, भारत):

ससेर कांगरी II हे शिखर याची पूर्व बाजू ७५१८ मीटर इतकी असून दुसरी पश्चिम बाजू ७५०० मीटर इतकी आहे.

या शिखराचा लद्दाख भाषेत असा अर्थ होतो 'ससेर' म्हणजे पिवळा 'कांगरी' म्हणजे बर्फ पर्वत.

जगात या शिखराचा ४९ वा क्रमांक आहे.

 

 

 

८. ससेर कांगरी III शिखर (उ.लद्दाख , भारत):

कांगरी III शिखराची उंची हि ७४९५ इतकी आहे. हे भारतातील सर्वात सातव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे.

जगातील ५१ वे सर्वोच शिखर आहे.

 

 

 

९.तेरम कांगरी I शिखर:

तेरम शिखराची उंची ७४६२ इतकी आहे.

तेरम कांगरी हे शिखर लडाख मध्ये आहे या शिखराचा काही भाग चीनच्या शक्सगाम व्हॅलीमध्ये आहे.

हे शिखर उंचीत भारतात नवव्या क्रमांकावर येतो आणि जगात उंचीत या शिखराचा छपणावा क्रमांक आहे.

 

 

१०. जोंगसोंग शिखर (भारत,नेपाळ, तिब्बत(चीन)):

या शिखराची ७४६२ इतकी उंची आहे.

उंचीच्या बाबतीत जोंगसोंग शिखराचा जगात ५७ क्रमांक लागतो.

जोंगसोंग शिखर हे त्रिबिंदूत आहे म्हणजे काही भाग भारत, नेपाळ आणि तिब्बत या तीन भागात आहे त्यामुळे त्रिबिंदू म्हटले आहे.

 

 

 

जगात एकूण १४ पर्वत शिखरे सर्वोच आहेत. जगातील सर्वात उंच हे एव्हरेस्ट शिखर आहे आणि भारतात कांचनगंगा हे आहे. हा ब्लॉग वाचल्यावर समजले असेल की, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते तर ते कांचनगंगा आहे. आपण भारतातील हे १० सर्वोच शिखरे आहेत.

 

तुम्ही जर कुठे ट्रिप ला जाण्याचा विचार करत असाल तर खालील काही पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्र ते पाहावे हि स्थळे अतिशय सुंदर आहेत.

 

हे जरूर वाचा :

(India)भारतातील गोड्या पाण्याचे सरोवर कोणते ?

भारतातील खाऱ्या पाण्याचे सरोवर ?

(India)भारतातील सर्वात मोठे धरण ?

Post a Comment

Previous Post Next Post