मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल कि आपण Voting card काढण्यासाठी nvsp.in साईट चा उपयोग करतो.

पण काही बांधवाना रेजिस्ट्रेशन करण्यात अडचण येत असेल तर ती आपण या ब्लॉग मध्ये सोडवणार आहोत.

तर आता आपण रेजिस्ट्रेशन कसे करावे ते पाहणार आहोत.

nvsp वरून मतदार यादी कशी डाउनलोड करावी ?

मतदान कार्डसाठी रेजिस्ट्रेशन

nvsp हा url आपल्या सर्च बार मध्ये टाकून सर्च केल्यावर तुम्हाला www.nvsp.in हा url  दिसेल त्यावर क्लिक करावे.

त्या URL वर क्लिक केल्यावर पुढच्या इंटरफेस वर आल्यावर तुम्हाला LOGIN/REGISTAR वर क्लिक करावे.

 

nvsp.in
मतदान कार्ड काढणे 

LOGIN /REGISTAR वर क्लिक केल्यावर खाली दिलेल्या पेज सारखा दिसेल.

जर तुम्ही पाहिल्या वेळेस login करत असाल तर तुम्हाला पहिले new registration करावे लागेल.

त्या पेज वर गेल्यावर dont have account, register as a new user  या वर क्लिक केल्यावर खाली दिलेल्या पेज सारखा interface दिसून येईल.

 

nvsp.in
मतदान कार्ड काढणे 

वर दिलेल्या पेज वर Mobile No व Captcha टाकून send otp वर क्लिक करावे.

otp आपल्या मोबाईल वर मिळाल्यावर तो खालच्या रिकाम्या बॉक्स मध्ये टाकून verify करून घ्या, नंतर तुम्हाला  I have EPIC number  व

तुम्हाला

खाली दिलेल्या फार्म मधील सर्व माहिती भरून व्यवस्तीत भरून घ्यावी.

 

nvsp.in
मतदान कार्ड काढणे 

माहित पूर्ण  व्यवस्तीत भरली आहे का ते पाहून register वर क्लिक करावे.

रेजिस्टर यशस्वी झाल्यावर तुम्ही  login पेज वर redirect होताल त्या पेज वर आल्यावर आपला login id password टाकून लॉगिन करावे.

लॉगिन झाल्यावर तुम्हाला खाली दिलेल्या प्रमाणे पेज दिसेल.

 

nvsp.in
मतदान कार्ड काढणे 

वरील पेज वर तुम्हाला  ६ पर्याय दिसतील त्यापैकी  तुम्हाला नवीन मतदान कार्ड काढायचे असेल तर, Fresh inclusion/ enrollment या पहिल्या पर्याया वर क्लिक करायचे आहे.

१. Fresh inclusion/ enrollment ( नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी)

२. Migration to another place

३. Correction in personal detail ( कोणाचे मतदान कार्ड वरील काही चूक बरोबर करण्यासाठी)

४. Deletion of enrollment ( self /family)

५. Replacement of electors photo identity card

6. Download e-epic ( मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी)

 

फॉर्म भरण्याची सुरवात /पद्धती  (nvsp.in)

Fresh inclusion/ enrollment या पर्याया वरती क्लिक केल्यावर तुम्हाला 

 *Citizenship

 
 
 Select state form which you wish to apply for Voter ID
 
 

Citizenship या मधील तुम्ही जर इंडियामधील असताल तर first option select करा, इंडियाबाहेर चे असताल तर second option select करावा.

पुढे तुम्हाला आपले state select करायचे आहे, ते select करून Next वर क्लिक करायचे आहे.

 

nvsp.in
मतदान कार्ड काढणे 
 

मित्रांनो  आता आपण  ६ step चा फॉर्म भरायचा आहे,

 *Address (nvsp.in)

१. Assembly Constituency select करावी.

२. Address मध्ये आपला पोस्टल address भरायचा आहे.

३. Upload Document (Any one)

  • Driving license 
  • Ration card 
  • Electricity bill
  • Water bill 
  • Telephone bill 
  • Gass connection bill 
  • Income tax assessment order 
  • Rent agreement 
  • Indian passport 

४. Enter family EPIC if applicable ( या ब्लॉक मध्ये आपल्या घरातील कोणाचा हि मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे )

हे सर्व व्यवस्तीत भरावयाचे आहे.

 

nvsp.in
मतदान कार्ड काढणे 

 * Date of birth 

१. Enter your birth detail  ( date of birth ,town /village,state ,district) भरवायचे आहे.

२.  Upload document (Age proff )

  • Birth certificate
  • Pan card
  • Indian passport
  • Aadhar letter issued by uidai
  • Driving license
  • Marksheet of class १० or ८ or ५
  • age declaration (ज्यांचे मतदान कार्ड काढायचे आहे त्यांचे वय २१+ असेल तर हा फॉर्म लागतो, तो फॉर्म प्रिंट करून पूर्ण भरून अपलोड करायचा आहे.)

 

 *Personal detail (nvsp.in)

१. Enter your personal detail मध्ये आपल्याला (name) नाव (surname) आडनाव आणि  (gender of applicant)अर्जदाराचे लिंग हे भरावयाचे आहे.

२. Enter your father /mother /husband detail

संबंध प्रकार (type of relation)

अर्जदाराच्या नातेवाईकाचे नाव (Name of relative of applicant)

अर्जदाराच्या नातेवाईकाचे आडनाव (Surname of relative of applicant)

मित्रांनो तुम्ही हा personal detail हा बॉक्स भरल्यावर व्यवस्तीत तपासून बघा.

Upload document 

Your photograph  (फोटो हा jpg,jpeg फॉरमॅट मध्ये असावा व जास्तीत जास्त २ इतका असावा.)

फोटो हा selfie काढलेला नसावा.

हे सर्व भरून झाल्यावर next क्लिक केल्यावर तुम्हाला  additional information  हे पेज ओपन होईल.

 

 *Additional information

 या पेज वर तुम्हाला please choose if you are differently abled  असे दिसेल त्याखाली चार option दिसतील त्यामध्ये पहिला

 visual impairment (कमजोरी)

 speech &hearing disability ( ऐकायला येत नसेल तर सिलेक्ट करावे) 

 locomotor disability(पाय अपंग असेल तर)

 other 

पुढे तुम्हाला optional email id व मोबाईल नंबर टाकायचा आहे, व पुढे next वर क्लिक करावे, क्लिक केल्यावर तुम्हाला  declaration हा पर्याय ओपन होईल.

 

 *Declaration 

place आणि date  टाकून घ्यावी (ठिकाण आणि दिनांक भरावी)

हि माहिती भरल्यावर next वर क्लिक केल्यावर preview हा पर्याय ओपन होईल.

 

 *Preview (फॉर्मचा शेवट)

मित्रांनो preview हे पेज म्हणजे तुम्ही आतापर्यंत भरलेली सर्व माहीती या option मध्ये एका फॉर्मच्या स्वरूपात दिसते. 

                         !!ती माहिती लक्ष्यपूर्वक तपासून घ्या व नंतर submit करून घ्यावे!! (तुम्ही हा फॉर्म प्रिंट करून सुद्धा ठेऊ/घेऊ शकता)

मित्रांनो हा फॉर्म भरल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती आलेला reference no वरून तुम्ही Online Application Status पाहू शकता.

हे status पाहण्यासाठी nvsp या साईट वर आल्यावर तुम्हाला track Application Status या पर्याया वरती क्लिक करावे.

 

nvsp.in
track Application Status


पुढे Enter reference id टाकून track status वर क्लिक करावे.

 १. BLO Appointed याच्याकडे हा फॉर्म १५ ते १६ दिवसात जाईल व नंतर सर्व कागद्पत्र verification होतील आणि हे मतदान कार्ड तुम्हाला  दोन ते  तीन महिन्यात किंवा जर तुमच्या गावात किंवा कोणतीही निवडणूक असेलत तर ते लवकरच मिळेल.

         

nvsp.in
मतदान कार्ड status check 

                







Post a Comment

Previous Post Next Post