मित्रांनो digital satbara आता आपण घरी बसून सुद्धा काडू शकतो. हा सातबारा काढण्यासाठी फक्त आपल्याला १५ रुपये खर्च करावे लागतात.
तर हा डिजिल सातबारा कसा काढावा त्याबद्दल पाहणारा आहोत, अगदी सोपी पद्धत आहे.
digital satbara कसा काढावा
मित्रांनो हा सातबारा काढते वेळी तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर व बँकेचे atm card किंवा इंटरनेट बँकिंग असेल तर त्याचा user id व password असणे अति आवश्यक आहे.
कारण हे १५ रुपये पे करते वेळी हे लागणार आहे.
आपण bhulekh.mahabhumi.gov.in या साईट वर जाऊन सातबारा काढतो.
त्यासाईट वर होम पेज ओपन झाल्यावर तुम्हाला वरच्या बाजूस digital sign ७/१२ दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
![]() |
७/१२ व ८अ |
दुसऱ्या पेज वर आल्यावर तुम्हाला regular login आणि otp based login दिसेल. तुम्हाला पहिला पर्याय निवडल्यास रेजिस्ट्रेशन करत बसावे लागेल, नंतर password विसरला जाऊ शकतो त्यामुळे,
सगळ्यात सोपा पर्याय तुम्हाला otp based login निवडावे लागेल.
ते निवडल्यावर तुम्हाला आपला मोबाइल नंबर टाकून send otp वर क्लिक करावे लागेल,
आणि त्याच्या खाली तुम्हाला तो आलेला otp प्रविष्ट करावा, आणि verify otp करावा.
verify otp केल्यावर नंतर पुढचे पेज ओपन होईल.
![]() |
७/१२ व ८अ |
आपला जिल्हा, तालुका, गाव सर्वे नंबर /गट नंबर शोधा हा पर्याय दिसेल त्यावर आपला गट नंबर टाकून घ्या नंतर लगेच त्याच्या खाली सर्वे नंबर /गट नंबर निवडावा लागेल.
![]() |
७/१२ व ८अ |
recharge amount वरती क्लिक केल्यावर खाली दिलेल्या प्रमाणे पेज उघडेल त्यामध्ये आपल्याला लागणारी amount enter करावी.
पुढे pay now वर क्लिक करावे
![]() |
७/१२ व ८अ |
नंतर i accept refund policy या पर्याय दिसेल त्यावर मार्क करून confirm करायचे आहे.
![]() |
७/१२ व ८अ |
payment केल्यावर त्या पेज वरती आपण redirect होतो म्हणजेच परत येतो. आणि खाली दिलेल्या प्रकारे your payment was successfull नंतर तुम्हाला कार्ड payment करायचे असेल तर ते निवडावे नाहीतर internet banking असेल तर तो पर्याय सिलेक्ट करावा.
![]() |
७/१२ व ८अ |
असा पेज दिसेल ती recipet चा screenshot काढावा किंवा लिहून ठेवावा, जेणेकरून काही अडचणी आल्यातर check payment status वर chek करता येईल.
![]() |
७/१२ व ८अ |
लगेच त्या खाली download option दिसेल त्यावर क्लिक केल्यावर आपला सातबारा /उतारा डाउनलोड झालेला दिसेल.
(महत्वाची टीप :सर्वे नंबर गट नंबर निवडते वेळी तो व्यवस्तीत पहा तो आपलाच आहे का)
Post a Comment