शेतकरी : आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो .
तेव्हा कुठे त्याला भाकरी मिळते. ते एवढे काबाड कष्ट करतो तरिदसुद्धा त्याला वार्षिक खर्च बघितला तर काहीही शिल्लक राहत नाही.
तो रात्र दिवस आपल्या शेतात कष्ट करतो तरी त्याला त्याच्या जीवनात काहीही स्वप्न पूर्ण करता येत नाहीत.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा हे वाक्य काही चुकीचे नाही ,परंतु जगाचा पोशिंदा हा गरीबच का. तो हा कष्ट करून माल मिळवतो तेव्हा कुठे सर्व लोक त्या अन्न धान्यावर जगतात.
शेतकऱ्यांनी जर ती धान्य जर नाही विकले तर भारततील अन्न धान्य हे दोन ते तीन संपेल.
तेव्हा खरी शेतकरयांचे मोल कळेल.
शेतकरी पाऊस पडल्यानंतर जेव्हा पेरणी करतो त्यावेळेस तो पुर्ण पणे पावसाच्या भरोश्यावर असतो.आणि पाऊस जर नाही पडला तर त्याला दुसऱ्या वेळेस पेरणी करावी लागते.
पहिला खर्च आणि दुसरा खर्च व पूर्ण वर्षाची पिकाची फवारणी , डुबनी ,काढणी , भरडनी काम पूर्ण करून पीक मिळते.
शेतकरी ते विकून आपल्या जीवन आवश्यक वस्तू घेतो आणि त्याला दुसरा कश्याचा हि विचार करता येत नाही कारण सर्व पैसे खर्च झालेले असतात.
शेतकऱ्याचा साथी बळीराजा . शेतकऱ्याचा काळ एक ना एक दिवस येणारच. विधानसभा व राज्यसभेत मात्र शेतकऱ्याचे कोणी काही बोलत नाही.
![]() |
शेतकरी आत्मकथा थोडक्यात |
शेतकरी व भारत सरकार : सरकारने आता शेतकऱ्याला थोडं चिंता मुक्त केले आहे , कारण शेतकऱ्यासाठी जीवन संजीवनी दिली आहे म्हंनजे पीएम किसान सन्मान निधी , पोकरा योजना, विमा ई सरकारी योजना दिल्यामुळे जागाचा पोशिंदा थोडा चिंता मुक्त झाला आहे.
परंतु शेतकऱ्याचा खर्च पण वाढला आहे.
शेतकऱ्याचे यामध्ये काहीही फायदा होत नाही ,परंतु सरकारी योजनामुळे थोडी चिंता कमी झाली आहे . सरकारने शेतकऱ्यासाठी फक्त शेतीमालाला भाव द्यावा.
शेत मलाला कवडीमोल भाव दिला जातो.
शेतकारी एवढे कष्ट करून सुद्धा नॊकरी करणाऱ्या लोकांची बरोबरी करू शकत येत नाही ,परंतु त्यांना सुटीचा दिवस जरी असला तरी पगार मिळतो.
पोशिंदा हा सर्वात श्रीमंत आहे पण त्याच्या शेतमालाला भाव नाही.
शेतकऱ्याची फरपट हि पाहिल्यानंदा पण होत होती आता पण होत आहे, पण सरकार जेव्हा शेतकऱ्याचा विचार करेल तेव्हा शेतकरी सुधरेल .
लेखन : सचिन चंद्रशेखर सर्जे [उस्मानाबाद ]
बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते .
Post a Comment