जननी आत्मकथा : जगात एकच न्यायालय आहे की जिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम आयुष्यात काही नसले तरी चालेल
आई-बाबा हात नेहमी आपल्या पाठीशी असतो व आई सारखा चांगला टीकाकार कोणी नाही आणि तिच्या सारखा कणखर पाठीराखा ही कोणी नाही .
आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे प्रेमाचे सागर उचंबळत असतात.
आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडली तरी चालेल पण कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका.
आ म्हणजे आस्था ई म्हणजे ईश्वर जीवनात दोनच गोष्टी मागा आई शिवाय घर नको आणि कोणतीही आणि कोणाचीही आई बेघर नको .
खूप मोठे व्हा पण जीवन देणाऱ्या आईला विसरू नका नेहमी दोन स्त्रियांचा स्वीकार करा जिने तुम्हाला जन्म दिला आहे
आणि जिने फक्त तुमच्यासाठीच जन्म घेतलाय पुरुष शिकला तर फक्त एक पुरुष साक्षर होतो पण एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंब साक्षर होते .
प्रेमाची माय जननी आई
त्या जननीला अनेक नमस्कार
मुलांना सतत खुश ठेवते ती आई
![]() |
माझे आई-बाबा |
आईचे थोरवी सांगायला
शब्द कधीच पुरणार नाहीत......
तुझे उपकार फेडायला
सात जन्म सुद्धा पुरणार नाहीत
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी आयुष्यात तुम्ही किती शिकलात पैसा आणि नाव कितीही कमवाल तरी माझे आई-बाबा गुरु यांच्या आशीर्वादाशिवाय सर्व काही व्यर्थ .
आईची किंमत कशाने हि मोजता येत नाही आणि आईच्या प्रेमाची किंमत कुणालाही आई असल्यास कळणार नाही ,परंतु जेव्हा आई नसेन तेव्हा आईची किंमत कळेल .
![]() |
माझे आई-बाबा |
पूर्वजन्माची पुण्याई असेन जन्म जो तुझ्या गर्भात घेतला जग पाहिले नव्हते तरी ९ महीने श्वास स्वर्गात घेतला.
लहानपणी आपण आई माझ्याकडे ये म्हणून भांडत असतो आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे राहूदे म्हणून बहिणी भावंडांबरोबर भांडन करत असतो.
संध्याकाळच्या जेवणाची काळजी करत असते ती आई आणि आयुष्यभराच्या जेवणाची काळजी करतात ते बाबा
हजारो माणसे मिळतील आयुष्यात आपल्या हजारो चुका माफ करणारे आई वडील पुन्हा मिळत नाहीत .
या जगात एकच सुंदर व छान मुल आहे व ते प्रत्येक आई जवळ असते.
आकाशा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही .
डोळे बंदठेऊन प्रेम करते ति प्रेयसी डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती डोळे वटारुन प्रेम करते ती पत्नी
मरेपर्यंत प्रेम करते ति फक्त न फक्त आई आई आणि आईच .
खिशातल्या हजार रुपयाची किंमत सुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या एक रुपया पेक्षा कमीच असते.
लेखन : सचिन चंद्रशेखर सर्जे [उस्मानाबाद ]
बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते .
Post a Comment