भुत प्रेतांचे गाव : [ राजस्थान जसलमेर , कुलधारा ] : १७० वर्षपासून कुलधारा गावामध्ये कोणी सुद्धा राहत नाही . तेथील लोकांचा समज आहे कि त्या गावामध्ये भुतांचा रहिवास आहे . कुलधारा गावामध्ये ब्राम्हण लोक राहायचे ते सांगतात कि याठिकाणी सतत कोणी कोणी असण्याची श्यक्यता वाटते . कुलधारा गाव जसलमेर पासून १८ किलोमीटर लांब आहे . तेथील पालीवाल समुदायाच्या जवळ एकूण ८४ गावे होती . ईस १२९१ मध्ये ६०० घरे कुलधारा गावात होती . कुलधारा गावामध्ये त्या ६०० घरामध्ये तापमान जरी ४५ डिग्री च्या वर असेल तरी सुद्धा त्या घरामध्ये गरम होत नव्हते . पालीवाल लोक तेव्हा शेती करत आणि गाई गुरे राकत असत . पालीवाल लोकांनी पावसाळ्यातील पाणी साठवण्यासाठी आताच्या विहीरि सारखा खडा करून पाणी त्यात साठवायचे . कुलधारा गावाला एकच मोठा दरवाजा होता .
![]() |
कुलधारा गावाचे रहस्य |
उजाड कसे झाले : राज्याचा दिवाण सालम सिंग या दिवानाचा डोळा त्या गावातील एका मुलीवर पडला . त्या मुलीला मिळवण्यासाठी दिवाण तेथील पालीवाल लोकांना त्रास देऊ लागला होता . दिवानाने त्रास देऊन झाल्यावर त्या मुलीच्या घरी पत्र पाठवले कि, पुढच्या पौर्णिमेपर्यंत ती मुलगी जर नाही मिळाली तर मी गावात येऊन त्या मुलीला उचलून घेऊन जाईन . यासाठी गावातील सर्व लोक त्या गावातील एका मंदिरात जमले आणि पालीवाल लोकांनी ग्रामसभेत ठरवले कि आपण त्याला आपली मुलगी नाही द्यायची मग लोकांनी विचार केला कि आपण सर्व जण रात्रीत हे गाव सोडून जाऊ . आणि त्या लोकांनी जाताना त्या गावाला शाप दिला कि या गावा मध्ये कोणी हि राहू सहकणार नाही . आता सध्या हे गाव जसेच्या तसे आहे या गावात आजही पालीवाल लोकांनी दिलेल्या शापाचे वास्तव आज हि आहे . जसलमेर मधील लोक म्हणतात कि लोक त्या ठिकाणी राहण्यासाठी जातात पण ते लोक वापस येत नाहीत .
![]() |
कुलधारा गावाचे रहस्य |
वैज्ञानिक कार्यसंघ [ दिल्ली ] : वैज्ञानिकांचा संघ ४ मे ला कुलधारा गावात गेला होता . वैज्ञानिकांना ठरवले आपण त्या गावात जाऊन शोध लावाल पाहिजे .मग एका रात्री वैज्ञानिकांचा संघ झोपल्यानंतर एका वैज्ञानिकांनी अनुभवले कि रात्री झोपेत कोणीतरी माझ्या खांद्यावरून हात फिरवत होते . मी मागे वळून बघितले तर कोणी सुद्धा नव्हते . कार्यसंघ चे उपाध्यक्ष अंशुल शर्मा म्हणले कि आमच्याकडे घोष्ठवोक्स यंत्र आहे . या यंत्राच्या साहाय्याने आम्ही भूतांशी संपर्क करू शकतो बोलू शकतो . अंशुल शर्मा म्हणले कि काही भुतांनी सुद्धा सांगितली . वैज्ञानिक जेव्हा त्यांच्या गाडी कडे आले तेव्हा त्या गाडीवर लहान मुलांच्या हाताचे ठसे दिसले .
![]() |
कुलधारा गावाचे गेट |
राजस्थान मधील कुलधारा या गावत सहाशे घरे होती पण त्या गावात येण्या जाण्यासाठी मोथा एकच दरवाजा होता
लेखन : सचिन चंद्रशेखर सर्जे [उस्मानाबाद ]
बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते .
Post a Comment