महाभारतात असा एक योद्धा होता कि ज्याला महाभारताचे युद्ध अवघ्या एका मिनिटात संपवण्याची ताकत होती आणि तो म्हणजे बार्बरीक.
बार्बरीक घटोत्तग्ज आणि अहिलावती यांचा मुलगा होता आणि गदाधारी भीमाचा नातू होता . राजस्थानमधील सिकर जिल्यामध्ये हे भव्य मंदिर,श्री श्याम मंदिर -खाटू शाम जी आहे ,प्रामाणिक मनाने प्रार्थना केल्यास सर्व अडचानी दूर होतात .
![]() |
महान योद्धा बार्बरीक |
श्री कृष्ण व बार्बरीक
लहानपणापासूनच बार्बरिकला शस्त्र अस्त्र यांवर ज्यास्त प्रेम होते, लहानपणापासूनच बार्बरीकाने त्याच्या आईकडून सर्व विद्या शिकून घेतल्या होत्या .
बार्बरीक आपल्या आईला युद्धाच्या कमकुवत बाजूने लढण्याचे वचन दिले होते.त्याने कठोर तपस्चर्या करून तीन अजिंक्य बाण मिळवले होते .
भगवान शिवजींना प्रसन्न करण्यासाठी त्याचवेळी अग्निदेवने त्याला दिव्य धनुष्य दिला .बार्बरीकच्या दिव्य बाणांनी आणि युद्धाच्या दुर्बल बाजूचे समर्थन करण्याचे वचन दिल्याने श्रीकृष्णाला त्याने युद्धात भाग घेऊ नये असे वाटत होते .
जर बार्बरिकने युद्धामध्ये भाग घेतला असता तर त्यांनी निश्चितपणे आपल्या वडिलकावुन युद्ध केले असते , परंतु जेव्हा कौरवांची बाजू कमकुवत होईल, तेव्हा तो त्यांच्या आईच्या इच्छेनुसार त्यांच्याकडे गेला असता.
त्याच्या पराक्रमामुळे पांडवांची बाजू कमकुवत झाल्यावर तो त्याच्या बाजूकडे परत जात .याच प्रकारे तो सर्वांचा नाश करील त्यामुळे श्री कृष्ण त्याला भाग घेऊ देत नव्हते .
श्री कृष्ण भगवान यांना जेव्हा बार्बरीकची युद्धामध्ये सामील होण्याचे समजले तेव्हा ते एका ब्राम्हणाच्या वेशात आले आणि बर्बरीकाच्या वाटेने गेले , आणि बर्बरिक चा चेष्ठा करू लागले कि हा तीन बाणाने युद्ध जिंकेल.
कृष्णाचे हे शब्द ऐकून बार्बरीक म्हणाले की, त्याच्याकडे अजिंक्य बाण आहे आणि तो एका बाणाने संपूर्ण शत्रू सैन्याचा नाश करू शकतो आणि बाण त्याच्या जागी परत येतो .
बर्बरीकची चाचणी घेण्यासाठी श्री कृष्णा म्हणाले की ज्या पिंपळाच्या झाडाखाली आपण उभे आहोत त्या सर्व झाडाच्या पानांना जर त्याने छिद्र केले तर मी सहमत आहे की ,आपण या युद्धाचा निकाल एका बाणाने बदलू शकता.
बर्बरीकने आव्हान स्वीकारून देवाची आठवण करून बाण सोडला आणि सर्व पानांना छिद्र झाले . त्यानंतर बाण भगवान श्रीकृष्णाच्या पायाभोवती फिरू लागला, कारण त्याच्या पायाखाली एक पान दाबले गेले होते .
![]() |
महान योद्धा बार्बरीक |
श्री कृष्णाचा जेव्हा विश्वास बसला , तेव्हा त्यांच्या योजनेनुसार ब्राह्मण (रुपबदलून ) श्री कृष्णाने बार्बरीकाकडून देणगी मागण्याची इच्छा प्रकट केली .
बार्बरिकने देणगी देण्याचे वचन दिले तेव्हा श्री कृष्णांनी बर्बरीकला त्याचे डोके मागितले . बर्बरिकला समजले की अशी देणगी ब्राह्मण असू शकत नाही.
बार्बरीकने कृष्णाला म्हणाले कि तुमचा वास्तविक परिचय द्या . यावर श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की मी कृष्ण आहे, सत्य जाणल्यानंतर हि बर्बरीकने आपले डोके ( शीर ) देणे मान्य केले परंतु त्याने अशी अट घातली की मला तुमचे महान रूप पहायचे आहे आणि महाभारतचे युद्ध सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचे आहे.
श्री कृष्ण भगवंतांनी बार्बरिकची शेवटची इच्छा पूर्ण केली, सुदर्शन चक्राने बार्बरीकचे डोके कापले आणि त्याच्या डोक्यावर अमृत टाकले आणि टेकडीच्या उंच टोकावर ठेवले. त्या ठिकाणाहून बार्बरिकच्या डोक्याने हे युद्ध पाहिले .
![]() |
महान योद्धा बार्बरीक |
युद्ध संपल्यावर पांडवांमध्ये कोणाचे ज्यास्त योगदान यावर वाद झाला होता, तेव्हा श्रीकृष्णा म्हणाले की, संपूर्ण युद्ध पाहिलेले बार्बरीक सांगतील .
बार्बरीक म्हणले की या युद्धामध्ये सर्वात मोठे योगदान श्री कृष्णाचे आहे. मी सुदर्शन चक्र युद्ध भूमीवर फिरताना पाहिले, कि श्री कृष्णा सैन्याला मारत होते .
महाभारतातील कोणता योद्धा जिवंत आहे ?
Post a Comment