धाराशिव : [ तुळजाभवानी मंदिर , तुळजापूर ]
धाराशिव [तुळजाभवानी मंदिर ] : उस्मानाबाद ते तुळजापूर चे अंतर हे २१.८ किलोमीटर [NH ५२ ] व उस्मानाबाद चे पहिले नाव धाराशिव होते आणि तेथील तुळजाभवानी मंदिर हे जग प्रसिद्ध आहे.भारतामध्ये ऐकावंन शक्तिपिठामधील तुळजाभवानी हे एक शक्तीपीठ आहे.व महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तिपिठातील तुळजाभवानी हे एक शक्तीपिठ. उस्मानाबाद शहर हे तुळजाभवानी मुळे प्रसिद्ध आहे.शिवाजी महाराजांना तुळजाभवाणीने दिलेली तलवार लंडनमधील संग्रहालयात आहे.उस्मानाबादची खरी ओळख तुळजापूर तुळजाभवानी मंदिरामुळे आणि वाकाटक लेणी मूळे उस्मानाबादला या जिल्याला ओळखले जाते .
तुळजापूर : तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीनि केला होता . तुळजापूरच्या आईला महाराष्ट्राची कुलस्वामीनी असे मनले जाते .तुळजापूर मंदिर हे यादवकालीन आहे असे मानले जाते. तुळजाभवानी मंदिराला मजबूत असे दोन दरवाजे आहेत .त्या दरवाज्यांना राजमाता जिजाऊ आणि शहाजी अशी नावे आहेत.तुळजाभवानी ची मूर्ती ही पाषाणाची आहे व मूर्तीची उंची तीन फुटाची आहे .आईची आठ हाताची मूर्ती आहे त्यातील आठ हातात शंख ,चक्र,बाण, बिचवा ,त्रिशूल ,धनुष्य ,पानपात्र आणि राक्षसाची शेंडी पाठीवर बाणाचा भाता .देवीच्या डोक्याच्या डाव्या बाजूला सूर्य व उजव्या बाजूला चंद्र आणि दोन पायामध्ये महिषासुराचे डोके आहे.
लेणी [ उस्मानाबाद /धाराशिव ]: लेणी ही उस्मानाबाद शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. लेण्यांना चांभार लेणी असे म्हणतात. बौद्ध लेणी वाकाटक शैलीत आहे व बौद्धभिखुसाठी १४ विश्राम गृहे आहेत.धाराशिवच्या २० किलोमीटर अंतरावर ७ जैन लेणी आहेत. हि लेणी ६ व्या शतकात बालाघाट डोंगर रांगेत कोरलेली आहेत. ६व्या शतकात विष्णू ,शंकर यांचे कोरलेली मूर्ती चित्र हे आता हि बघायला मिळतात .त्या काळातील मूर्ती हि उत्कृष्ट रित्या म्हणजे हातानी बनवायचे त्यामुळे ते आता हि वास्तव्यात आहेत. हाताने घडवलेली मूर्ती हि सर्वात सुंदर आणि ओरिजनल आहे.लेणी मध्ये प्रसिद्ध अशी ७ जैन लेणी आहे व ८ स्तंभ आहेत आणि ५ प्रवेश दरवाजे आहेत. दुसऱ्या काही लेण्यामध्ये २२ खोल्या असून तिथे भगवान पार्श्वनाथ यांची मोठे चित्र आहे.
पेशवाईच्या काळातील माहिती : लेण्यांमध्ये हरी नारायण नावाचे सत्पुरुष ध्यानसाधना करत होते . सत्पुरुषांचा मठ उस्मानाबाद /धाराशिव मध्ये आहे.
![]() |
| उस्मानाबाद ओळख [ लेणी ] |
लेखन : सचिन चंद्रशेखर सर्जे [उस्मानाबाद ]
मो : ८३९०५७८०२०
बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते .
![उस्मानाबाद ओळख [ तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर व उस्मानाबाद लेणी ] उस्मानाबाद ओळख [ तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर व उस्मानाबाद लेणी ]](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnx1pEbaJCFWJv47vj1fEFu4KATfw7ha-UHZdHaEkM3SR-mOQdhx_dELABJ4Ih8LH2zEWGASUsSDiZZ3awfVPt6l6kW2KyOhLKwh37Rhe-cqzVfhzjyf7Ytm5WQKeKtpsP-kanUTiQ3uXw/s16000-rw/GET%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A0%25E0%25A5%2580+%252824%2529.jpg)
![उस्मानाबाद ओळख [ तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर व उस्मानाबाद लेणी ] उस्मानाबाद ओळख [ तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर व उस्मानाबाद लेणी ]](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgItzoAKiMrMwJSIeH2c5BlzM36JPqsK1TLa3jHrPbHrxY_Ck5qx6wL5SqSLxpBK1kCunTr__E13FOQM1a5zCJh0Rdlf_7RBq0hh0D7ZyXvGWXjBrQDfoJ1PYpsJNle57vPkEIOwsbhmOWL/s16000-rw/GET%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A0%25E0%25A5%2580+%252825%2529.jpg)
![उस्मानाबाद ओळख [ तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर व उस्मानाबाद लेणी ] उस्मानाबाद ओळख [ तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर व उस्मानाबाद लेणी ]](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi_tiTjjvJ0A_EgUNpBI2RZpJbj50oEoTe8A5zvI-KcWc75_ugskBQc2e-tGkgg7AunC4lGvFTXaprXRK6KdKeIWHjYTHma95JMGZSO4LQQuFE3lV7yALsh1fSJgaoq7gB_cbJN5xiTYmJ2/s16000-rw/GET%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A0%25E0%25A5%2580+%252826%2529.jpg)
Post a Comment