bhulekh.mahabhumi.gov.in मित्रांनो आपल्याला सातबाऱ्यावरील काही चुका झाल्या असतील तर त्या कश्या दुरुस्त करायच्या त्या बदल आपण जाणनार आहोत.
आपण हा अर्ज घरबसल्या तलाठी कार्यालयाला पाठवू शकता.
आपण घरबसल्या आपल्या मोबाईल वरून सुद्धा करू शकतो आपण त्या बदल माहिती पाहनार आहोत.
अर्ज कसा करावा
पहिली स्टेप मित्रानो आपल्याला bhulekh.mahabhumi.gov.in हि साईट आपल्या डेस्कटॉप (कॉम्पुटर) वर किंवा मोबाईल वर ओपन करावी.
महसूल विभागाची साईट ओपन झाल्यावर तुम्हाला सर्वात खालच्या बाजूला (https://pdeigr.maharashtra.gov.in) ७/१२ दुरुस्तीसाठी ई हक्क प्रणाली हा पर्याय दिसेल.
![]() |
भुलेख.महाभूमी. या साईटवरून ७/१२ दुरुस्ती अर्ज कसा करावा |
या पेज वर क्लिक केल्यांनतर पब्लिक डेटा एन्ट्री पेज ओपन होईल.
नंतर पेजच्या शेवटच्या भागात Proceed to login हा पर्याय दिसेल त्या वरती क्लिक करा नंतर user login पेज दिसेल त्याच्या खालच्या बाजूला create new user account हा एक पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.
तुमच्या समोर new users sign up हे पेज ओपन होईल.
हे पेज ओपन झाल्यावरती पहिले तुमचे नाव व्यवस्तीत भरायचे आहे.
user name टाकायचा आहे व check availability या पर्याय वर क्लिक करायचे आहे.
जर ते user name उपलब्ध आहे का ते पाह्यचे आहे.
![]() |
भुलेख.महाभूमी. या साईटवरून ७/१२ दुरुस्ती अर्ज कसा करावा |
ते झाल्यानंतर password टाकून घ्यायचा आहे व त्याच्या पुढेच re-enter password हा पर्याय दिसेल त्यात पण आपण पहिल्या वेळेस टाकलेला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे.
त्याच्या खाली Security Question हा पर्याय असेल त्यामधील तुम्हाला सोईस्कर जो पर्याय वाटेल तो निवडावा त्याच्या पुढेच security answer मध्ये त्या प्रश्नाबद्दल चे answer भरावा.
खालच्या बाजूला आपला मोबाईल नंबर, ई-मेल, पॅन नंबर, पिनकोड व country सिलेक्ट करून स्टेट सिलेक्ट करावे.
त्याच्या खालच्या बाजूला जिल्हा आणि शहर/गाव भरायचे आहे व नंतर आपला पत्ता भरावा.
नंतर captcha code व्यवस्तीत भरून घ्यावा आणि पूर्ण माहिती चेक करून घ्या.
हे सर्व झाल्यावर save बटण वर क्लिक करावे.
सर्वात खालच्या बाजूला Registration Successfull असा मेसेज येतो हा user name आणि password लक्ष्यात ठेवायचा आहे.
त्या पृष्ठावरील back चे बटन दाबून
लॉगइन आयडी तयार (bhulekh.mahabhumi.gov.in)
आपल्या लॉगिन पेज वर यायचे आहे,व तो user nameआणि password टाकल्यानंतर registration ,merriage ,efiling , ७/१२ mutations ,e-registration ,
e-property card असे आठ पर्याय उघडतील त्यातील आल्याला सातबारा (land record) दुरुस्तीसाठी ७/१२mutations वर क्लिक करायचे आहे.
![]() |
भुलेख.महाभूमी. या साईटवरून ७/१२ दुरुस्ती अर्ज कसा करावा |
नंतर Select Role Type हा पर्याय दिसेल त्यामध्ये सामान्य नागरिकांसाठी user is citizen
बँक कर्मचारी असतील तर त्यांच्यासाठी user is bank हे निवडायचे आहे.
आपण हे खास करून शेतकऱ्यांसाठी सांगत आहोत तर शेतकरी वर्गांनी user is citizen हा पर्याय निवडावा व प्रोसिड वर क्लिक करावे.
![]() |
भुलेख.महाभूमी. या साईटवरून ७/१२ दुरुस्ती अर्ज कसा करावा |
आता तुम्ही फेर फार अर्ज प्रणाली या पेज आले असाल तर आता आपला जिल्हा तालुका गाव निवडावे.
![]() |
भुलेख.महाभूमी. या साईटवरून ७/१२ दुरुस्ती अर्ज कसा करावा |
या असलेल्या पर्यायातील तुम्हाला जो पर्याय निवडायचा असेल तो निवडू शकता .
परंतु आपण आता सातबारा दुरुस्ती कार्याची आहे तर आपल्याला त्यातील हस्तलिखित आणि संगणकीकृत सातबाऱ्यात तफावत दुरुस्ती हा पर्याया वर क्लिक करावे.
![]() |
भुलेख.महाभूमी.या साईटवरून ७/१२ दुरुस्ती अर्ज कसा करावा |
या फोटो मध्ये तुम्हा या फॉर्म ओपन होईल
ओपन झाल्यानंतर पहिले त्यावर अर्जदाराचे नाव ,मोबाइल नंबर, ई-मेल भरून पुढे जा या बटनावर क्लिक करायचे आहे.
![]() |
भुलेख.महाभूमी. या साईटवरून ७/१२ दुरुस्ती अर्ज कसा करावा |
दुसऱ्या पेज वर खातेदाराचे पहिले नाव किंवा खाते क्रमांक टाकावा व खातेदार शोधा वर क्लिक करून खातेदारचे नाव निवडावे.
त्या खातेदाराला कोणत्या सातबाऱ्यावरील नाव दुरुस्त करायचा आहे तो गट क्रमांक निवडायचा आहे.
![]() |
भुलेख.महाभूमी. या साईटवरून ७/१२ दुरुस्ती अर्ज कसा करावा |
हि सर्व भरल्यावर त्या खाते धारकाची माहिती दिसेल त्यांनतर ऑनलाईन सातबाऱ्यात झालेली चूक पाहावी ती निवडावी.
नंतर खातेदारची नाव दुरुस्ती व क्षेत्र दुरुस्ती यामधील तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडावा.
पण आपण आता खातेदारचे नाव बदल करायचे आहे.
त्या ठिकाणी खाते धारकांचे कोणते बदल करायचे ते बदल करावे.
हे सर्व व्यवस्तीत पूर्ण केल्यावर पुढे जा वर क्लिक करावे.
तुम्हाला या पर्यायामध्ये जुना हस्तलिखित सातबारा अपलोड करावा लागेल.
इतर या पर्यायामध्ये जुने फेर फार उतारे असतील तर ते अपलोड करायचे आहेत.
खालच्या बाजूस स्वयंघोषणापत्र दिसेल.
या घोषणापत्रात सदरील माहिती फक्त संगणकीय सातबाऱ्यात बदल होईल ते हस्तलिखित सातबाऱ्यात बदल होणार नाही अशी सविस्तर माहिती असते.
agree करून पुढे जायचे आहे.
तलाठी व मंडळ अधिकारी
(bhulekh.mahabhumi.gov.in) हे सर्व पूर्ण केल्यावर agree बटण वर क्लिक केल्यावर तुमचा ऑनलाईन केलेला अर्ज हा तलाठी कार्यालयात पोचेल व त्यांच्या कडून चेक करून झाल्यावर
मंडळ अधिकाऱ्याकडे गेल्यावर ते (Certified) प्रमाणित करतात.
अश्या प्रकारे शेतकरी बांधवाची अडचण दूर होते.
Post a Comment