कृषी परिवर्तन
Nanaji deshmukh कृषी बांधवानो तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल कि नानाजी देशमुख योजनेमार्फत सरकारने आपल्या पर्यंत काही योजना पोहचवल्या आहेत.
त्याची वाटचाल व खर्च बदल जाणून घेणार आहोत.
पोकरा योजनेत जागतिक बँक व राज्य सरकार यांच्याकडून आज पर्यंत ९१८ कोटी रुपये खर्च झाले.
तसेच या योजनेमुळे हजारो गावाच्या कृषी योजनेत सुधार झाला आहे.
![]() |
नानाजी देशमुख योजनेमुळे झाले कृषी परिवर्तन |
२०१८ मध्ये चालू झालेल्या पोकरा योजनेच्या ४ हजार कोटीच्या प्रकल्पात पहिल्या वर्षी २०१८ मध्ये २२२ कोटी तर २०१९ मध्ये ६६४ कोटी रुपये खर्च झाले.
या प्रकल्पात जागतिक बँकेकडून २८०० कोटी रुपये घेण्यात आले.
राज्याचे १२०० कोटी रुपये घेण्यात आले आहेत.
पोकरा चा हा प्रकल्प १५ जिल्यामधील ३८३५ गावामध्ये या योजनेचा लाभ मिळत आहे.
या शासनाच्या प्रकल्पामळे शेतीसाठी पूरक असे साधने मिळाली.
पोकराची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिली जात आहे.
या योजनेचा लाभ १५% अनुसूचित जातीमध्ये आणि ६१% इतर मागासवर्ग व ११% अनुसूचित जमातीमध्ये मदत देण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ वर्धा ,वाशीम , उस्मानाबाद , औरंगाबाद ,बीड ,नांदेड , हिंगोली ,परभणी ,लातूर , अकोला ,अमरावती ,जळगाव ,बुलढाणा , यवतमाळ या
जिल्ह्यातील ३८३५ गावामध्ये अनुकूल शेतीव्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत व या समित्यांना पावणे पाच कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे.
नानाजी देशमुख योजने मुळे बागायतदार असलेल्या शेतकऱ्यांना भरपूर फायदा झालेला आहे.
आणखी एक सर्वात महत्वाचे म्हणजे कृषी विस्तार करण्यासाठी १७३८ कृषिताईची निवड करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक गावातील लोकांचे उत्पादन या योजनेने वाढणार आहे.
पोकरा (pocra )खर्च (Nanaji deshmukh)
अवयव
१. प्रकल्पाचा व्यवस्थापन
खर्च ७२,७८,७८,००० खर्च
२. शिक्षण प्रसिद्धी २, ४३, ५५,००० खर्च
३. जलसिंचन (Irrigation) ५४४, ८९, ६६, ००० खर्च
४. शेतीतील प्रयोग व
हवामान बदल २३८,०९,९०,००० खर्च
५. शेतकऱ्याच्या उत्पादक
कंपन्या ९,३०,१८,०००
६. बियाणे शृंखला
सुधारणा १३,४६,९९,०००
७. संपर्क साधने
माहिती ११,८५,३०,०००
८.लघु पाणलोट योजना ७,७४,१३,०००
९. कृषी सल्ल्ला १३,४६,९९,०००
१०. हवामान बदलाचा
अभ्यास १०,८२,०००
११. संस्थाबरोबरची
भागीदारी ५८९०००
१२. क्षमता बांधणी
खर्च ५९८ ,३५, ०००
१३. मूल्य शृंखला
बळकटीकरण ५,६३,६८,०००
१४. मूल्यमापन व
सनियंत्रण ३,२३,०४,०००
१५. हवामान बदलाचा
अभ्यास १०,८२,०००
नानाजी देशमुख यॊजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी भरपूर अश्या सुविधा दिल्या आहेत. या योजनेचा लाभ आता शेतकऱ्या साठी फायदेशीर ठरणार आहे.
Post a Comment