इतिहास
पाहिल्या वेळेस सजावटीसाठी उपयोग केला जात होता. टोमॅट हा स्पॅनिश शब्द ज्यापासून टोमॅटो हा इंग्रजी शब्द तयार झाला . त्याची उत्पत्ती दक्षिण अमेरिका मधील एनडीज आणि मध्य अमेरिका येथे झाली.
ऍझटेक लोकांनी युद्धाच्या वेळी याचा स्वयंपाकात वापर केला होता.या फळाचे उत्पादन समशीतोष्ण वातावरणात घेतले जाते.
![]() |
टोमॅटो लागवड कशी करावी |
सूप बनवण्यासाठी पहिल्या वेळेस सुरवात जोसेफ कॅम्प बेल यांनी केली.
ओळख १५५४ च्या साली झाली. दक्षिण अमेरिकेतील मधील पेरू देशातील वनस्पती आहे.
युरोप खंडातील इटली या देशाने इ.स. १५५० मध्ये प्रथम tomato लागवड करण्यास सुरुवात केली.
इ.स १७८१ मध्ये व्हर्जिनिया या देशात अमेरिकेलतील थॉमस जेकर्सनने प्रथम लागवड केली.
फिलाडेल्फिया या ठिकाणी एका फ़्रेंच माणसाने १७८९ मध्ये ही वनस्पती नेली.
सण १८०० सालापासून मानवाच्या खाण्यात वापर चालू केला.
इ.स.१९०० मध्ये भारतात या फळाची माहिती झाली असे म्हंटले जाते.
टोमॅटो उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे आणि चीन चा पहिला आहे, भारतमधील जास्त उत्पादन घेणारे राज्य पश्चिम बंगाल, बिहार , महाराष्ट्र , छत्तीसगड , आंध्रप्रदेश , तामिळनाडू , कर्नाटक , गुजरात , ओडिसा इ राज्य आहेत.
टोमॅटो लागवड कशी करावी
१. पहिले माती परीक्षण करून घ्या. त्याप्रमाणेच खतांचा वापर करा.
मित्रांनो जर तुम्ही लागवड करणार असाल तर पाहिले तुम्हाला तुमच्या शेतात मुबलक पाणी असणे गरजेचे आहे.
लागवड करते वेळी पहिले नांगरणी करून घ्यावी व त्यानंतर रोटर करून घ्यावे.
रोटर केल्यानंतर त्याचे बेड तयार करून घ्यावे, त्यानंतर मल्चिंग पेपर हातरून घ्यावे, बेड तयार केल्यानंतर दोन बेड मधील अंतर ५ फूट ठेवावे.
बेड वर्ती रोप लावताना लक्ष्य ठेवावे कि ते रोप १ फुट अंतरावर असणे आवश्यक आहे, रोप लावते वेळी झिग झ्याग पद्धतीने लावण करावी.
प्लॉट मध्ये ७ व्या दिवसानंतर ह्यूमिक ऍसिड, मायक्रो nutrient यांची ड्रिंचिंग करून ,१५ ते २० दिवसानंतर बुरशीनाशक फवारणी करून घ्यावी.
बागेसाठी मंडप काठी मजबूत असणे आवश्यक असते ते काठी कश्याचीही हि असो फळबागेत एक महिन्यानंतर मंडप करून करावा, मंडप केल्यावर त्याची व्यवस्तीतरित्या बांधणी करून घ्यावी.
पडणारे रोग अळी , भुरी , थ्रिप्स , मावा या रोगापासून वाचण्यासाठी फवारणी करणे.
६० ते ६५ दिवसात पिकलेले सर्व टोमॅटो ची तोडणी करून घ्यावी.तोडणी झाल्यानंतर ते साईझ नुसार निवडन घ्यावे कारण त्याचा भाव अलग असतो अलग ठरतो.
जर तुम्ही त्यांचे अलगीकरन /वेगळे नाही केले तर तुमच्या मालाला मिळणारा भाव कमी मिळेल.
सरळ वाणांमध्ये हेक्टरी ३५ ते ४० टन संकरित वाणांमध्ये हेक्टरी ५५ ते ६० टन
भारतातील टोमॅटो चे सर्वोत्तम बियाणे
शेतकरी बांधवानो जर तुम्ही लागवड करत असाल तर खालील प्रमाणे सर्वोत उत्कृष्ट बियाण्याची यादी दिली आहे त्याप्रमाने पाहू ..
१. अविष्कार
२. सीओक्स
३. वैशाली
४. रश्मी
५. मार्गलोब
६. अभिनव
७. पुसा अर्ली बैना
८. रुपाली
अविष्कार
सीओक्स
या जस्तीचे फळ डोंगराळ भागात या प्रकारचे बियाणे शेतीसाठी महत्वाची आहेत.
![]() |
टोमॅटो लागवड कशी करावी ( सीओक्स ) |
वैशाली
या जातीच्या फळामध्ये वजन ८० त १०० ग्राम वजन असते, हे फळ लाल रंगाचे असते.
रश्मी
या जातीचे फळ हे पूर्ण गोल आकाराचे असते, या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
मार्गलोब
या जातीच्या फळामध्ये ज्यास्त प्रमाणत रस असतो, व्हरायटी दिली येथे विकसित झाली. या जातीचे बियाणे डोंगर भागात ज्यास्त प्रमाणात येतात.
अभिनव
या जातीच्या फळामध्ये ८० ते १०० ग्राम वजन भरते, आपल्या भारतामध्ये सर्वोत्कृष्ठ जातीचे बियाणे आहे.
पुसा अर्ली बैना
या जातीच्या फळामध्ये एकरी सरासरी 15 टन उत्पादन निघते , नवी दिल्ली येथील कृषी संशोधन संस्थने विकसित केलेली व्हरायटी.
रुपाली
या जातीमध्ये सुद्धा गोल प्रकारचीअसतात, या व्हरायटीची फळे गुळगुळीत असतात.
खतांचे व्यवस्थापन
जैविक खतांचा वापर केल्याने पीक हे चांगल्या प्रकारे येते. लागवडीसाठी क्षेत्र तयार करते वेळी तुमच्या क्षेत्रानुसार शेणखत मिळवावा.
नत्र ३०० किलो, स्फुरद १५०किलो , पालाश १५० किलो , संकरित वाणासाठी वापरा
रसायनिक खाते हि नत्र २०० किलो, स्फुरद १०० किलो ,पालाश १०० किलो सरळ जातीसाठी वापरावी.
Post a Comment