Happy Independence Day Quotes In Marathi  मित्रांनो आपनाला सर्वाना माहीतच आहे कि आपल्या भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले होते, म्हणून आपण दर वर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. 

भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा 1857 ते 1947 पर्यंत 90 वर्षांहून अधिक काळ चालला.

खास म्हणजे मित्रांनो आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योगदान दिलेल्या वीर पुरुषांचे स्मरण या दिवशी केले जाते.

भारतातील प्रत्येक भारतीयांसाठी १५ ऑगस्ट हा दिवस महत्वाचा दिवस असतो. आपल्या भारताच्या लाल किल्यावर पंतप्रधान यांच्या  हातून तिरंगा फडकवला जातो आणि यावर्षी हि फडकवला जाणार आहे.

आपल्या भारताचा हा २०२१ मधील ७५ वा स्वातंत्र्य दिन आहे.


मित्रांनो सध्या कोव्हीड ची साथ असल्यामुळे सार्वजनिक ठिकणी आणि शाळामंध्ये स्वातंत्र्य दिन हा ऑनलाईन साजरा केला जाईल.



राष्ट्रध्वज वर्णन 

पहिला राष्ट्रध्वज १९०६ मध्ये बनवला होता.

१. आपल्या भारताचा राष्ट्रध्वजावर पहिल्या स्थानी केशरी रंग आहे.

२. राष्ट्रध्वजावर मध्यभागी तो पांढरा आहे.

३. आपल्या तिरंग्यावर शेवटच्या स्थानी गडद हिरवा रंग आहे.

४. पांढऱ्या पाट्याच्या मध्यभागी नेव्ही ब्लू  कलरचे अशोक चक्र आहे. आणि त्यामध्ये २४ आऱ्या आहेत आणि त्या मनुष्यातील २४ गुण दर्शवतात.


राष्ट्रध्वज विश्लेषण 

१. राष्ट्रध्वजाचा पहिला केशरी रंगधैर्य आणि त्यागाचे प्रतीक मानला जातो तसेच .हा रंग धैर्य आणि निस्वार्थी भावना दर्शवते. 

२. पांढरा रंग सत्य, शांती आणि शुद्धतेचे व  स्वच्छता आणि ज्ञानाचे भी प्रतीक मानले जाते.

३.  हिरवा रंग - समृद्धीचे प्रगतीचे आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते.




स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्या (Happy Independence Day Quotes In Marathi) 

Happy Independence Day
१५ ऑगस्ट Independence Day


१. "वाऱ्यामुळे नाहीतर 
   भारतीय सैनिकांच्या श्वासामुळेच  
   फडकतोय तिरंगा".... 

२. कोण्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदयात आणि आत्म्यात वसते.

३. "आमुचा स्वदेश हिंदुस्थान
     आम्हां हिंदूंचा तो केवळ
      होय जीव कीं प्राण"

 

४. जर चुकीला माफी नसेल तर ब्रिटिशांपासून मिळालेल्या स्वातंत्र्याचा अर्थच काय.

 

५. आपली देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि देशाचा विकास कसा होईल.

 

६. "स्वातंत्र्य वीरांना करूया 
      शत शत प्रणाम 
      त्याच्या निस्वार्थ त्यागानेच 
      भारत बनला महान" 

 

७. "आमुचा स्वदेश हिंदुस्थान
     आम्हां हिंदूंचा तो केवळ
      होय जीव कीं प्राण"

 

८. बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो.....

 

९.  कधीच न संपणार आणि शेवटच्या स्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देश प्रेम.


Happy Independence Day wishes in Marathi

Happy Independence Day Quotes, Message In Marathi


१. तरुणांचा संहार म्हणजेच राष्टांचा संहार,

कारण तरुण हेच राष्ट्राचे प्राण आहेत.

२. सहनशीलता आणि स्वातंत्र्यता एक महान राष्ट्राचा पाया आहे.


 ३. आपला जन्म हा आपल्या देशाच्या उपयोगी आला तर तो खरा जन्म.

 

४. देवभक्ती पेक्षा देशभक्ती श्रेष्ठ आहे.

५. आम्हला अभिमान आहे कि आम्ही या देशाची मुले आहोत.

६. आमचा तिरंगा हा आमची ओळख आहे.

७. आमचा मान शान आणि सर्वस्व आहे तिरंगा.

 Happy Independence Day Quotes In Marathi ! स्वातंत्र्य सैनिकांच्या घोषणा (Slogan Freedom Fighter)  

Happy Independence Day Quotes In Marathi
स्वातंत्र्य सैनिकांच्या घोषणा 


१. वंदे मातरम - बंकिम चंद्र चट्टोपाध्याय.  

२. सत्यमेव जयते - पंडित मदन मोहन मालवीय.

३. जय हिंद - सुभाषचंद्र बोस.

४. चलो दिल्ली - सुभाषचंद्र बोस.

५. अराम हराम आहे - पंडित जवाहरलाल नेहरू.

६. करु किंवा मरु (करो या मरो) - महात्मा गांधी.

७. इंग्रजांनो भारत सोडा (इंग्रजो भारत छोडो) - महात्मा गांधी.

८. इंकलाब झिंदाबाद - भगतसिंग.

९. आम्ही शत्रूच्या गोळ्यांचा सामना करणार, आम्ही मुक्त आहोत! मुक्त राहू ! - चंद्रशेखर आझाद 


Happy Independence Day Message In Marathi

मित्रांनो हॅपी इंडिपेंडन्स डे हा दिवस सर्व भारतीयासाठी उत्सवाचा आणि आनंदाचा दिवस असतो.
आपल्याला हे स्वतंत्र पाहायला मिळाले ते काही महान व्यक्तींच्या बलिदानामुळे. नाहीतर आज आपण इंग्रजांच्या गुलामीत असतो.आणि त्यांच्या गुलामीत असतो तर हे आज चे आनंदी असणारा भारत आपण पाहू शकत नव्हतो.
१५ ऑगस्ट या दिवशी आपण आपल्या भारत देशासाठी बलिदान केलेल्या महान पुरुषांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतो.
आपला भारत देश आज स्वतंत्र आहे तो त्या वीर, पराक्रमी व्यक्तीमुळे आणि आज सध्याच्या काळामध्ये आपला देश हा सर्व बाबीत पुढे जात आहे. आपला भारत देश पुढे जाण्याचे कारण म्हणजे विविधते मध्ये एकता.

भारतातील सुरक्षा रक्षकामुळे आज आपण सुरक्षित आहोत. आपले भारतीय आर्मी ,SSB , CRPF , POLICE , SRPF इत्यादी बलाचे रक्षक आपले कर्तव्य काळजीपूर्वक पार पाडतात, त्यांच्यामुळेच आज आपण निश्चिन्त राहत आहोत.
पण मित्रांनो आपण त्यांच्या बदल कधी विचार केला आहे का?
मित्रांनो आपल्या भारत मातेसाठी हे वीर जवान कोणताही वेळेला तत्पर असतात आणि आपल्या भारतमातेसाठी ते आपला जीव देण्यासाठी सुद्धा मागे हटत नाहीत.
आपल्या भारत मातेसाठी जो जवान आपले प्राण देतो तो कधीच मरत नाही तो अमर असतो..

आपल्या मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा जवानांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्या 


Happy Independence Day SMS In Marathi
१५ ऑगस्ट स्वतंत्रता दिवस 


१. "उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला 
नतमस्तक मी त्या सर्वांचा 
ज्यांनी आपला भारत देश घडविला"
      !! जय हिंद ..जय भारत !!    🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

२. "रंग बलिदानाचा तिरंग्यात पाहावा,
उत्साह देशप्रेमाचा अंगात संचारावा
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा 
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चुरायू व्हावा"
        !! जय हिंद ..जय भारत !!
🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

३. "वेष , रुप , रंग,भाषा  जरी 
अनेक आहेत 
तरी सारे भारतीय एक 
आहेत"
         !! जय हिंद ..जय भारत !!
🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

५. "he राष्ट्र, देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे 
आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे" 
           !! जय हिंद ,,जय भारत !!
🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

६. "विविधते मध्ये एकता हीच भारताची खरी शान आहे 
म्हणूनच मी आणि आम्ही गर्वाने सांगतो 
भारत देश महान आहे"
          !! जय हिंद ..जय भारत !!
🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

७. "ज्यां वीरांनी लिहिली आझादीची गाथा 
आम्ही त्यांच्या चरणी ठेवतो माथा"
           !! जय हिंद .. जय भारत !!
🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

८. आम्ही या देशाचे सर्व  तरुण पिढी शपथ घेत आहोत,
कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत
आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहणार,
आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहू..
         !! जय हिंद… जय भारत !!
🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

Happy Independence Day Quotes In Marathi (चारोळ्या)

Happy Independence Day Quotes, kavita In Marathi
स्वातंत्र्य दिनाच्या चारोळ्या 

 

१. "प्रेम तर सर्वच करतात 
आपल्या प्रियकरावर 
कधी आपल्या देशावर प्रेम करून पहा
तुमच्यावर सर्वजण प्रेम करतील"
       !! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

२. "माझ्या या जन्माला नजराणा 
माय भूमीस पेश व्हावा 
तिरंगाचा व्हावा 
गणवेश माझा"
        !! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या 🇮🇳

३. "स्वातंत्र्याची ध्वजा फडकते 
सूर्य तळपतो प्रगतीचा 
भारत भूमीच्या पराक्रमाला 
अमुचा मानाचा मुजरा"
        !! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

४. "आठवण स्मरावी त्यांची 
बलिदान ते केले 
क्रांतीसाठी झटले 
अन क्रांतिवीर जे झाले"
           !! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

५. "स्वातंत्र्यासाठी केला होता 
अनेकांनी त्याग 
वंदन करून तयाशी 
आज ठेउनी त्यांच्या बलिदानाची जान 
करू भारत देशाला प्रणाम"
             !! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

६. "तिरंगा झेंडा फडफडे 
जय जय कार बोला 
१५ ऑगस्ट आज
आमुचा भारत स्वतंत्र झाला"
               !! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

७. "मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राणे वने 
स्वैर उडती पक्षी नभी 
आनंद आज उरी निनादे"
               !! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

८. "वादळातून नौका काढून 
आम्ही आणली तीरावर 
देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे 
स्वातंत्र्य दिनाच्या मोक्यावर"
                !! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

९. "न धर्माच्या नावावर जगा 
न धर्माच्या नावावर मरा 
माणुसकी धर्म आहे या देशाचा 
फक्त देशासाठी जगा" 
                !! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

१०. "किती आक्रोश तो जाहला 
किती रक्तांच्या नद्या वाहिल्या 
सडा पडला मृतदेहांचा तेव्हा 
स्वातंत्र्य दिन उदयास आला"
                 !! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

११. "असा भारत हवाय 
सगळ्यांची जात हि भारतीय असेल 
धर्म ,उच्च ,नीच ,भेदभाव 
सीमापार असेल"
                 !! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳


१२. "निशान फडकत राही 
निशान झळकत राही 
देशभक्तीचे गीत आमुचे 
दुनियेत निनादत राही"
              !! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳


१३. "आठवून शौर्याची गाथा 

अभिमानाने भरतो उर 

वेचले प्राण ज्यांनी त्यांच्या 

स्मृतीस वाहतो अश्रूंचा पूर"

!! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

१४. "दे सलामी या तिरंग्याला 
ज्यामुळे तुझी शान आहे 
हा तिरंगा नेहमी राहूदे उंच
जोपर्यंत तुझा जीव आहे" 
               !! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

 

१५. "भारत भूमी  स्वतंत्र करण्या तळहाती 

घेऊनि प्राण 

बलिदानाचे कफन बांधुनी 

लढले वीर महान" 

                !! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳



१६. "तारीख १५ ऑगस्ट माहे 
सोनेरी पहाट 
स्वातंत्र्याचा सूर्य उगवला 
एकोणीशे सतेचाळीस साली"
                  !! जय हिंद… जय भारत !!
 🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳
 



!!आपल्या तिरंग्या करीता या मातृभूमीकरिता आपले जीवन पूर्ण वाहिले 

अश्या या वीर जवानांना माझ्याकडून शत शत प्रणाम !!

 

 Happy Independence Day Quotes In Marathi!  Inspirational Quotes For Freedom Fighter.

Inspirational Quotes For Freedom Fighter.

Inspirational Quotes For Freedom Fighter


१. "आपले आयुष्य लांब असण्यापेक्षा 
आयुष्य हे महान असायला हवे"
🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

"LIFE SHOULD BE GREAT
RATHER THAN LONG "
     !! JAI HIND !!

2. "लक्षात ठेवा अन्याय सहन करणे 
आणि गलत का कामात साथ करणे 
सगळ्यात मोठा गुन्हा आहे"
🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

३."जीवन हे फक्त स्वतःच्या हिमतीवर (खांद्यांवर)जगले पाहिजे 
दुसऱ्यांच्या खांदयावर तर 
फक्त अंत्यसंस्काराचे प्रेत जाते"
🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳


'LIFE IS LIVED ON ITS OWN 
OTHER SHOULDERS ARE USED 
ONLY AT THE TIME OF FUNERAL'
         !! JAI HIND !!

४. "माणूस हा आपल्या गुणाने यश मिळवतो 
दुसऱ्याच्या कृपेने नाही"
🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

"MAN SUCCEEDS BY HIS QUALITIES 
NOT BY THE GRACE OF OTHERS"

५. "असे जागा कि तुम्ही उद्या मरणार आहात 
आपण असे शिका कि नेहमीच्या साठी जगणार आहोत"
🇮🇳 स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्या🇮🇳

 

Happy Independence Day Kavita In Marathi

Happy Independence Day Kavita In Marathi



१. आपला भारत तर स्वतंत्र झाला परंतु आपले विचार स्वतंत्र आहेत.
थोडा विचार करा मित्रानो खरी उत्तरे तर आपल्याकडेच आहेत.
का घडतात या वेड्या वाकड्या दुर्घटना 
काई म्हणत असेल रे भारत माता 
हे जरा ऐकना 

!!स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


२. भारत माझी जन्म भूमी 
विचारांची कर्मभूमी 
सह्याद्रीच्या निधड्या छातीने ती भरलेली आणि ,
स्वतःची स्वतंत्र अशी संस्कृती असलेली हि माय मातृभूमी माझी

!!स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


३.!!माझी मातृभूमी भारत देश हा काही काळापूर्वी सोन्याचा गोळा होती
विदेशीयांचा त्यावरती कायमच  डोळा होता 
आले होते इंग्रज सूट बूट घालून 
राहिले उभा भारतात आणि केला विचार घाव घालून टाकू वाट लावून 
भारतात एकी हि दिसत नव्हती समाजात 
ज्यांच्याकडे पैसा तो जुलमी माणूस त्यांच्या कार्यात 
लोकसंख्येच्या पाठी लावली दारिद्र्याने काठी 
माणूस जनावर बनू लागला त्याच्या टिचभर पोटासाठी 
मग इंग्रज फेकत होते टुकडे 
भारतीयांना काळात नव्हते 
हे होते त्यांच्यासाठीचे आकडे
आकडा धरला आणि फेकला गेला त्याच्या ताब्यात 
पाळून पोसून घेतला मराठी माणूस ताब्यात मग त्यांच्या आचार आणि विचारांचा 
चांगलाच झाला गुंता दिला धोका हा त्यानेच जो स्वतःला म्हणतो पोशिंदा 
आता काय जिकडे तिकडे होता अन्याच अन्याय 
पैशाकरिता विकली माय 
कोण कुठं कस वागतय काय 
सर्वानीच केली हाय हाय 
मग काय उभे राहिले रणांगण 
लढले आपले योद्धा 
पण कुठेही जातीपातीचा मांडला नव्हता मुद्दा 
लढले वीर लढले छत्रपती 
प्रत्येक जण लढला फक्त आणि फक्त त्यांच्या मातीसाठी 
आंबेडकरांनी दिला होता समानतेचा धडा बुद्धाच्या नावाखाली होता शांततेचा लढा 
जीकड़े तिकडे चालला विचार आणि तलवारीची धार 
म्हणूनच उघड्ले हे स्वातंत्र्याचे द्वार !!

!!स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


Happy Independence Day Shayari In Marathi

१. "विसरू नका त्या भारत मातृभूमीच्या 
वीरांचे बलिदान 
या दिवशी जे झाले 
होते आनंदाने कुर्बान 
स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत घ्यावी हि शपत 
आपल्या भारत मातेला बनवू आणखी महान"

!!स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!




Happy Independence Day Quotes In Marathi  तर प्रिय मित्रांनो आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या या वीर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाचा कधीही विचार न करता ते सतत आपल्या देशाला स्वतंत्र मिळ्वण्यसाठी झटत राहिले, 
आणि ते ९० वर्ष्याच्या काळ लोटल्यांनंतर वीर महापुरुषांच्या प्रयतणांना यश आले.







Post a Comment

Previous Post Next Post